Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहर पोलीस ठाण्याची पुन्हा दमदार कामगिरी, सात लाखाच्या ११ मोटारसायकली केल्या हस्तगत,आंतरराज्य टोळी जेरबंद

Mahesh Patil by Mahesh Patil
November 22, 2022
in क्राईम
0
नंदूरबार शहर पोलीस ठाण्याची पुन्हा दमदार कामगिरी, सात लाखाच्या ११ मोटारसायकली केल्या हस्तगत,आंतरराज्य टोळी जेरबंद

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या 6 लाख 70 हजाराच्या 11 मोटारसायकल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला यश आले आहे.सहा दिवसात नंदूरबार पोलीस निरीक्षण रविंद्र कळमकर यांची ही दुसरी मोठी कारवाई आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार प्रकाश रुपा चव्हाण, रा. नांदरखेडा ता. जि. नंदुरबार यांचे मालकीची 40 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. MH-39-L-2371) ही 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील बस स्थानक समोर असलेल्या डी.एस.के. मार्केट परीसरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

 

सदरचा गुन्हा हा मोटारसायकल चोरीशी निगडीत असल्यामुळे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेश दिला.

 

 

नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली. तसेच चोरीस गेलेल्या मोटारसायकलच्या शोधासाठी 3 पथके तयार केली.

 

 

 

गुन्हे शोध पथकाला मोटारसायकलची चोरी करणारे दोन इसम हे जगतापवाडी परीसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने जगतापवाडी परिसरात सापळा रचला असता संशयीत आरोपी हे.एका मोटारसायकलसह येत असतांना दिसुन आले. पोलीस पथकाने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता परंतु संशयीत आरोपी हे मोटारसायकलसह पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले.

 

त्यानंतर  नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विजय अंता पाडवीरा. मटावल ता. कुकरमुंडा जि. तापी (गुजरात राज्य), विनेश लक्ष्मण पाडवी, रा. जुन उंटावद ता. कुकरमुंडा जि. तापी (गुजरात राज्य) यांना आणून विचारपुस केली असता त्यांनी  नंदुरबार शहर येथून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडे 40 हजार रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल ( क्र. MH-39-L-2371) ही मिळाली असून त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 21 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदरची मोटारसायकल ही कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली.

 

 

तसेच त्यांच्याकडे अधिक विचारपुस करता त्याने आणखीन 10 मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. सदरच्या मोटारसायकली देखील कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.

 

 

60 हजाराची एक मरून रंगाची होंडा कंपनीची सी बी 125 शाईन एस पी विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं JC7380043074 व चेसिस नं. ME4JC732BG8020621 असा असलेली त्याबाबत शहादा पो स्टे येथे भादवि क 379 प्रमाणे दाखल, 80 हजाराची काळ्या रंगाची होंडा कंपनीची सी.बी. युनिकॉर्न मो.सा.(क्रं. GJ-26-B-7978) असा असलेली त्याबाबत उपनगर पो.ठाण्यात भादवि क 379 प्रमाणे दाखल, 70 हजाराची एक निळ्या रंगाची सुझुकी कंपनिची एक्सेस मो.सा.त्याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात
भादवि क 379 प्रमाणे दाखल,

 

 

70 हजाराची रुपये किंमतीची काळया रंगाची बाजाज कंपनीची 150 CC मोटारसायकल तिचा ( क्र. MH-39-M-4188) व इंजीन क्रमांक DH2CCJ29484 व चेचिस क्रमांक खोडलेले/ मिटवलेले असा असलेली ज.वा. कि. अं. जु, 60 हजाराची एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस तिचेवर निळा पट्टा असलेली स्प्लेंडर प्लस 135 विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं HA10AGLHAG0303 व चेसिस नं. MBLHAW087LHA94220 असा असलेली, 60 हजारची काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो तिचेवर पांढरा पट्टा असलेली मो.सा (क्रं. MH-39-S- 9532) असलेली त्याबाबत विसरवाडी पो स्टे मध्ये भादवि क 379 प्रमाणे गुन्हा दाखल, 70,हजराची एक राखाडी रंगाची होंडा कंपनीची सीबी शाईन तिचेवर निळा पट्टा असेलेली (मो सा क्रं MH-39- AE-7968 )असा असलेली, 50 हक्रची एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स तिचेवर लाल पांढरा रंगाचा पट्टा असलेली मो.सा विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं HA11EPJSG00068 व चेसिस नं. MBLHAR05735G00084 असा असलेली,

 

 

60 हजाराची एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस तिचेवर पांढरा पट्टा असलेली मो.सा. विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं HA11EYM5L51808 व चेसिस नं MBLHAW125M5L03917 असा असलेली, 50 हजाराची एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स तिच्यावर पांढरा पट्टा असलेली मो.सा. विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं HA11ENKSC10923 व चेसिस नं खोडलेले मिटवलेला अशाप्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच विविध ठिकाणाहुन चोरी केलेल्या वरील वर्णनाच्या व 6 लाख 70 हजाराच्या एकुण 11 मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे.

 

 

तसेच अटक करण्यात आलेले संशयित आरोपी यांचे अभिलेख तपासले असता विजय अंता पाडवी रा. मटावल ता. कुकरमुंडा जि. तापी ( गुजरात राज्य), यांच्याविरुध्द यापुर्वी शहादा पोलीस ठाण्यात 13 गुन्हे, तळोदा पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे, नवापुर पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे, शिरपुर पोलीस ठाणे (धुळे जिल्हा) येथे 1 गुन्हा असे एकुण 18 गुन्हे दाखल आहे तसेच विनेश लक्ष्मण पाडवी, रा. जुन उंटावद ता. कुकरमुंडा जि. तापी (गुजरात राज्य) याचेवर यापुर्वी अक्कलकुवा पो. ठाणे येथे 1 व शहादा पोलीस ठाणे येथे 1 गुन्हा असे एकुण 2 गुन्हे दाखल आहे.

 

 

सदर कारवाईत आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसुन नंदुरबार जिल्हयातुन चोरी गेलेल्या इतर मोटारसायकली हस्तगत होवु शकतात असे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे तसेच त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.

 

 

सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोहेकॉ अतुल बिऱ्हाडे, पोहेकॉ जगदिश पवार, पोहेकॉ संदिप गोसावी, पोना भटु धनगर, पोना बलविंद्र ईशी, पोना स्वप्निल पगारे, पोना स्वप्निल शिरसाठ, पोना योगेंद्र सोनार, पो. शि अनिल बडे, पो. शि.विजय नागोडे, पोशि इम्रान खाटीक, पोशि कल्पेश रामटेके, पोशि. युवराज राठोड, पोशि योगेश जाधव, पोशि हेमंत बारी, पोशि भालचंद्र जगताप, पोशिअफसर शहा यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकित ३८९ कोटीचा प्रारुप आराखड्यास मान्यता

Next Post

शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post
शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

October 15, 2025
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

October 15, 2025
जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

October 15, 2025
राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

October 13, 2025
जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

October 13, 2025
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

October 13, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group