म्हसावद l प्रतिनिधी
स्वातंत्र्य, संविधानासाठी अक्कलकुवा ते शहादा अशी ७५ किमी पदयात्रा काढून साजरा होणाऱ्या संविधान सन्मान समारोहाची बैठक बोधी वृक्ष परिसरातील विपश्यना केंद्रात संपन्न झाली.
या बैठकीला शिवाजीराव मोरे ,अनिल ओंकार कुवर , सुनील पाटोळे पितांबर पेंढारकर नरेंद्र दगा कुवर, नानाभाऊ शिंदे ,वेडू जगदेव ,रमेश बिरारी ,विष्णू जोंधळे यांची बैठकीला उपस्थिती होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे नियोजनावर चर्चा झाली. नियोजनानुसार शहादा तालुक्यांमध्ये मोठ्या गावांमध्ये शेवटून शहादा तालुक्यातील शेवटच्या गावापासून शहाद्यापर्यंत मोटरसायकल रैलीचे आयोजन करण्याचे आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत सर्वांनी अकरा वाजेपर्यंत पोहोचून 11 पासून 12 वाजेपर्यंत मुख्य मार्गाने महापुरुषांना अभिवादन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीचे सभेमध्ये रूपांतर होईल. या ठिकाणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या सहित सर्व पुरोगामी, आंबेडकरी, बहुजन व संविधानाला मानणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रबोधन मेळावा होईल. संविधानाच्या सन्मान करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
23 नोव्हेंबर पासून अक्कलकुवा येथे सुरू होणाऱ्या पदयात्रेला नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात होईल. त्या त्या ठिकाणी आपापल्या चळवळीतील विद्यार्थी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, शिक्षक संघटनेचे नेते, या सर्वांनी स्त्री पुरुषांसह पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचे आहे. सव्वीस तारखेला शहाद्यात जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी आपापल्या गावाचे कार्यक्रम दहा-साडेदहा वाजेपर्यंत आटोपून अकरा वाजेपर्यंत शहाद्याला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहोचायचे आहे. मोटरसायकल रॅलीने आणि तिथून एकत्रित जत्था घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहोत.
संविधान सन्मान समारोह नफरत तोडो नफरत छोडो, संविधान बचाओ भारत जोडो या अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आयोजन समितीच्या वतीने आपणास कळविण्यात येत आहे.पुढची बैठक 22 नोव्हेंबरला सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे. आपण सर्वांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.