Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने सत्तेसाठी कंबर कसली

team by team
November 22, 2022
in राजकीय
0
आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने सत्तेसाठी कंबर कसली
नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून पाच वेळा बिनविरोध मात्र आता सहावी पंचवार्षिक ची निवडणूकीत मतदान होणार १७ पैकी २ बिनविरोध तर १५ जागेसाठी ३ डिसेंबर ला मतदान होणार .सत्ताधारी पक्षाने आ.शिरीषकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनल उभे केले आहे.भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने सत्तेसाठी कंबर कसली असून पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले आहेत.
डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना सत्ताधारी पक्षाने आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनल उभे केले आहे तर भाजपने भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनलने निवडणुकीत कंबर कसली आहे. तर सत्ताधारी पक्षाने व परिवर्तन पॅनल ने आपापली सर्व ताकद लावून सत्ता कायम राहण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. ही निवडणूक प्रतिष्ठितेची झाली आहे.
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची  सहावी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना  स्थापन झाल्यापासून पाच पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ही सहावी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.
कारखान्याच्या १७ जागेसाठी निवडणूक लागली आहे.  २७ ऑक्टोंबर ते २  नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी होता.  3 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांवर छाननी झाली. ४ ते १८ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी होता. १९ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध झाली.दोन संचालक च्या जागा बिनविरोध झाल्याने आता १५ जागांसाठी मतदान होणार आहे.
 ३ डिसेंबरला मतदान होणार आहे. ४ डिसेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल ने सतरा तर परिवर्तन पॅनल ने आपले १५ उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत सतरा पैकी अजित नाईक व आरीफभाई बलेसरिया हे दोन उमेदवार बिनविरोध झाल्याने आता पंधरा जागांवर मतदान होणार आहे.
 कारखान्याच्या मतदार यादीत  ९५५९ सभासद पात्र आहेत. १५ जागेसाठी ९५५९ सभासद मतदानाचा अधिकार प्रथमतः बजावतील. मात्र या मतदारांपैकी काही मयत असू शकतात.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक भारती ठाकूर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीरज चौधरी काम पाहत आहेत. या कारखान्याच्या प्रचाराचा नारळ एक दोन दिवसात फुटेल अशी चर्चा सुरू आहे.
 निवडणुकीत आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून काँग्रेस पक्षाकडून शेतकरी विकास पॅनल उभा करण्यात आला आहे तर भाजपाच्या वतीने परिवर्तन पॅनल अधिकृत निवडणूक लढवत आहे.
परिवर्तन पॅनल आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित, माजी आमदार शरद गावीत तर  भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनल उभे केले आहे. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीत पहिल्यांदा मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या निकालावर पुढील राजकीय गणित स्पष्ट होणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे टिपू सुलतान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

स्वातंत्र्य, संविधानासाठी अक्कलकुवा ते शहादा ७५ किमी पदयात्रा

Next Post
स्वातंत्र्य, संविधानासाठी अक्कलकुवा ते शहादा ७५ किमी पदयात्रा

स्वातंत्र्य, संविधानासाठी अक्कलकुवा ते शहादा ७५ किमी पदयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add