नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकारसंघ नंदुरबार जिल्हातर्फे आज पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्या.
या निवेदनात म्हटले आहे की,पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष शहाबाज दिवकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी. निर्भीड पत्रकारिता करणार्या पत्रकारांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून विनाकारण त्रास दिला जातो.यावेळी पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा. ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून लाभ मिळावा यासाठी किचकट निकषांमध्ये बदल करण्यात यावे. निकष शिथिल करण्यात यावे व अधिस्वीकृतीधारक बाबतचे अधिकार त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांना देण्यात यावे.यु ट्यूब न्यूज चॅनलची अधिकृत नोंदणी करून त्यांना पत्रकारिता क्षेत्रात सामावून घेण्यात यावे.राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाइन वर्कर्सचा दर्जा मिळावा.राज्यातील सर्व शासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष स्थापन करावे.राज्यातील शासकीय विश्रामगृहाचा पत्रकारांना निशुल्क प्रवेश देण्यात यावा.राज्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र शासकीय विश्रामगृह उभारावे.पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी. मुंबई रेल्वे मध्ये पत्रकारांना मोफत प्रवेश देण्यात यावा.प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावे. वयोवृद्ध पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे पेन्शन योजना लागू करावी.पत्रकारांना शासकीय कर्मचार्यांना मिळणार्या विमा प्रमाणे मोफत कायमस्वरुपी आरोग्य विमा, अपघाती विमा संरक्षण मिळावे. शासकीय नोकर्यामध्ये पत्रकारांच्या कुटुंबातील व्यक्तिंना प्राधान्य देण्यात यावे.शैक्षणिक प्रवेशमध्ये पत्रकारांच्या कुटुंबियांना प्राधान्य मिळावे.श्रमिक पत्रकार ज्यांचे पत्रकारितेच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह अवलंबून आहे आशा पत्रकारांंना शासकीय योजनांमध्ये प्रामुख्याने लाभ मिळून देण्यात यावा.कोरोनाच्या काळात मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून द्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणार्या सर्व पत्रकारांना शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात यावे.अशासकीय समित्या,पोलीस दक्षता समिती,शांतता समिती, आरोग्य समिती,शालेय व्यवस्थापन समिती, महामंडळ व शासनाच्या नियंत्रणाखाली असलेले ट्रस्ट यामध्ये पत्रकारांना प्राधान्याने नियुक्ती करण्यात यावी.शासनाच्या वतीने राज्य राज्यस्तरीय पुरस्कार दिली जातात त्याच धर्तीवर जिल्ह्यातील पत्रकारांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. ६० वर्ष वय पुर्ण झाल्यावर सर्व निकष तपासुन ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्विकृती देवून विविध लाभ द्यावा.
सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्री ट्रस्ट नंदुरबार संचालित एस. ए. मिशन प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती सुलभा रंगराव पवार यांचे संस्थाचालकाने 6 वर्षापासून जीवन वेतन बंद केले आहे.सदर शिक्षिकेवर झालेल्या अन्यायाची चौकशी करून मुजोर संस्थाचालकावर त्वरीत कारवाई करा.समाजकल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांंना देण्यात येणारे जातपडताळणी दाखले विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले शाळा व महाविद्यालया मध्येच उपलब्ध करून देण्यात यावे.महाराष्ट्राचे दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ या पर्यटन स्थळाचा विकास करावा. तसेच शहादा-तोरणमाळ या 45 कि.मी. रस्त्याचे दुहेरीकरण करून तोरणमाळ ते गुजरात राज्यातील केवडिया कॉलनी जवळील स्टॅच्यू ऑफ युनिटीला नर्मदा नदीवर पूल बनवून कनेक्टिव्हिटी द्यावी. तसेच तोरणमाळ ते जैन धर्मियांचे तीर्थस्थान बावनगजा दरम्यान रस्ता निर्माण करा. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्याच्या डीलरकडे एका पेक्षा अनेक स्वस्त धान्य दुकाने आहेत अशा डीलरकडे फक्त एकच स्वस्त धान्याचे दुकान ठेवून बाकीचे तेथील स्थानिक पातळीवर असलेल्या पत्रकारांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील,जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील,कार्याध्यक्ष योगेश्वर बुवा,सुलभाताई पवार,सचिव गिरधर मोरे,मनोजकुमार बाफणा,भरत पाटील,मुरलीधर पाटील,के.डी.गिरासे, यशवंत कलाल आदी उपस्थित होते.