नंदुरबार l प्रतिनिधी
वनविभागाने केलेल्या कारवाईचा निषेध करत आदिवासी टायगर सेनेतर्फे धडगाव व शहादा वनविभागाला निवेदन देण्यात आले.
वनविभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
वनविभागाने केलेल्या कारवाईचा आदिवासी टायगर सेनेतर्फे निषेध नोंदवत आहोत. जल,जंगल,जमीन हे आमच्या आदिवासी समाजाच्या मालकीचे असून त्यावर रोजगार अवलंबून असणाऱ्या गरीब आदिवासी वर आपण धडक कारवाई करून शेखी मिरवत आहात त्याचे आमच्या तर्फे जाहीर अभिंनदन. प्रत्यक्षात 24 लाकडी खाट जप्त केल्या होत्या प्रत्यक्ष दर्शीनी त्या पाहिल्या होत्या तसेच वर्तमानपत्र मध्ये सुद्धा 24 खाटांचा उल्लेख आहे पण पंचनामा झाला 22 खाटांचा झाला मग या दोन खाटा गेल्या कुठे ? असा प्रश्न पडला आहे या दोन खाटा कोणाला बक्षीस देण्यात आल्या. या बाबतीत आम्हाला रीतसर माहिती आपणाकडून अपेक्षित आहे.
तसेच वनविभाग आमच्या सातपुड्यात भारत स्वतंत्र झाल्यापासून कार्यरत आहे तरी सुद्धा आजच्या घडीला जवळपास 90 टक्के डोंगर हे उघडे – नागडे झालेले आहे. त्याला जे दोषी अधिकारी असतील त्यावर कधी आपण अशी धडक कारवाई केली नाही कधी करणार आहात ? आम्हाला माहिती मिळणे अपेक्षित आहे .जे काही जंगल वाचलेले आहेत ते आमच्या आदिवासींनी वाचवले आहेत तरीसुद्धा आपला वनविभाग आमच्या गरीब आदिवासीवर धडक कारवाई करतो. जे काही डोंगर उघडे नागडे झालेले आहेत त्याची लाकूड तोड सर्रास पणे करून मोठ्या शहरामध्ये विकले गेले तेव्हा का नाही झाली अशी धडक कारवाई ! वनविभाग समोर डोगर उघडे आहेत याला जबाबदार कोण ? आपण दरवर्षी कित्येक योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केले तरी सुद्धा सातपुड्यातील डोंगर उघडे नागडे राहतात मग जातो कुठे? तसेच आपला कर्मचारी जंगल वाचवायला सातपुड्यात कधीतरी येतात नियमानुसार येथे राहणे असताना ते कर्मचारी राहत नाहीत असे दिसून येते . आपल्या विभाग मार्फत अर्थात काकडदा, बिलगाव आणि अक्राणी बिटात मागील १० वर्षात ज्या विविध जंगल संवर्धनाची कामे करण्यात आल आहे त्या कामांची यादी मिळावी. तसेच वनविभाग मार्फत रोजगार निर्मितीसाठी मनरेगा विभाग चालविण्यात येतो ,हा संशोधनाचा विषय आहे की आजपर्यंत किती लोकांना खरच रोजगार मिळाला आहे.वनविभाग मार्फत मनरेगा मधून गेल्या १० वर्षात राबविण्यात आलेल्या संपूर्ण माहिती आम्हास अभ्यास करण्यास मिळावी जेणेकरून धडक रोजगार निर्मिती कागदावर झाली का प्रत्यक्षात झाली हे निदर्शनास येईल.अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आदिवासी टायगर सेनेचे धडगाव तालुका अध्यक्ष संदीप पावरा यांची स्वाक्षरी आहे.