Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना मिळाला बाजार समिती निवडणूक लढविण्याचा अधिकार भाजपा आ.राजेश पाडवी यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन

team by team
November 18, 2022
in राजकीय
0
शेतकऱ्यांना मिळाला बाजार समिती निवडणूक लढविण्याचा अधिकार  भाजपा आ.राजेश पाडवी यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन

नंदुरबार | प्रतिनिधी-

सर्वसामान्य शेतकऱ्यालाही बाजार समितीची निवडणूक लढवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आ.राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे. बळीराजाला बाजार समिती निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्याबरोबरच आता निवडणूक लढविण्याचा अधिकारही देऊन शिंदे – फडणवीस सरकारने बळीराजाला बंधमुक्त करून न्याय दिला आहे , असेही  आ.राजेश पाडवी यांनी पत्रकात म्हटले आहे.

आ.राजेश पाडवी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ,  शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणूक लढविण्यास परवानगी देण्यासाठी  कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय गुरुवारी  झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात  सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व आणि प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे.

            देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत असताना शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार  देण्यात आला.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला. शिंदे – फडणवीस सरकारने सत्तेवर आल्या आल्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार पुन्हा बहाल केला. आता त्यापुढे एक पाऊल टाकत शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणूक लढविण्यासाठी  अधिनियमात दुरुस्ती केली आहे. ज्या शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी बाजार समिती व्यवस्था तयार करण्यात आली त्या व्यवस्थेत शेतकऱ्याला सहभाग घेण्याचा अधिकार देऊन शिंदे- फडणवीस सरकारने बळीराजाला प्रस्थापितांच्या तावडीतून बंधमुक्त केले आहे , असेही आ.राजेश पाडवी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

फसवणूकीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासुन फरार आरोपीसे राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या

Next Post

हेल्मेटचा वापर करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल रॅली

Next Post
हेल्मेटचा वापर करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल रॅली

हेल्मेटचा वापर करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add