नंदुरबार l प्रतिनिधी
चौथी राष्ट्रीय हातमाग गणना 2017 मध्ये अनावधानाने सुटलेल्या हातमाग तसेच विणकरांचा हातमाग गणनेत समावेश होण्यासाठी अर्ज सादर करावे असे आवाहन प्रादेशिक उप आयुक्त सु.म.तांबे यांनी केले आहे.
या गणनेचे काम महाराष्ट्र राज्यात मे.कर्वी डाटा मॅनेजमेंट सर्व्हीस लि.हैद्राबाद संस्थेमार्फत पुर्ण झालेले असून हातमाग गणनेत समावेश न झालेल्या विणकरांनी विहित नमुन्यातील अर्ज 10 दिवसाच्या आत प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम) 400601 (दूरध्वनी क्रमांक 022-25405363) येथे किंवा rddtextiles3mumbai@rediffmail. com या ई-मेलवर सादर करावे.