नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील न . पा . शाळा क्रमांक ९ जवळ एक दिवसाचे स्री जातीचे जिवंत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शहादा शहरात न . पा . शाळा क्रमांक ९ च्या कपांउड जवळ स्री जातीचे एक दिवसाचे जिवंत अर्भक याचा संपुर्ण परित्याग करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने उघड्यांवर टाकले.याप्रकरणी शिवलाल ठग्या पावरा रा. उमराणी ता.धडगाव यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरूद्ध भादवी कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास
मपोसई माया राजपूत करीत आहेत.