नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावर रामपूर फाट्याजवळ वाहनाने धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने वृद्धाचा मृत्यू तर एकास दुखापत झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील रामपूर येथील प्रताप जेमू नाईक (वय ६५) सव राजू नाईक हे अक्कलकुवा-तळोदा रस्त्याने जात होते. यावेळी एका चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून रामपूर फाट्याजवळ मागून प्रताप नाईक व राजू नाईक यांना धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात प्रताप नाईक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर राजू नाईक जखमी झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत निलेश दिलवरसिंग नाईक यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिल सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.








