तळोदा l प्रतिनिधी
येथील खान्देशी गल्लीतील गटारी तुंबल्याने पालिकेला सांगुनहीया कड़े दुर्लक्ष केले जात होते,परिसरातील नागरिकांनी स्वता तुंबलेली गटार साफ़ करत याचे छायाचित्र सोशल मीडिया वर प्रसारित करत नगरपालिकेच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त केले,
ह्या प्रभागातील नगरसेवक गौरव वाणी यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी लागलीच पालिकेच्या सफाई कामगारांना त्या ठिकाणी पाचारण करीत त्या परिसरातील गटारींची साफ़ सफाई स्वता उभे राहून करुन घेतली.
ह्या परिसरात नियमित कचरा संकलनाची वाहने येत नसून कचरा टाकावा तरी कुठ असा प्रश्न उपस्थित होतो.
नगरपालिकेचा शहरातील कचरा संकलनाचा ठेका संपल्याने अशी परिस्थिति निर्माण होत आहे,त्यामुळे पालिकेने हां ठेका लवकरच द्यावा अशी मागणी सध्या सोशल मीडिया वर् व्हायरल झांली आहे.