नंदुरबार l प्रतिनिधी
येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे बालदिनानिमित्त बालकांना स्वेटर वाटप करुन बालदिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ दिलिपराव मोरे यांच्याकडून लहान मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले.
सद्या थंडीचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत गरीब व गरजू लोकांना थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे घेणे परवडत नाही. याचे गांभीर्य जाणून राऊ मोरे यांनी स्वेटर वाटप करत बालकांच्या चेहर्यावर आनंद निर्माण केला. यावेळी नंदुरबार तालुकाध्यक्ष दिनेश माळी, नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक कार्याध्यक्ष कालु पैलवान, नाना माळी, आदनन मेमन, जय मोरे, बबु अर्जुन राठोड आदी उपस्थित होते.








