Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे : चक्क पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी चोरट्यांचा डल्ला, सर्विस पिस्टलसह दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

team by team
November 14, 2022
in क्राईम
0
अरे बापरे : चक्क पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी चोरट्यांचा डल्ला, सर्विस पिस्टलसह दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

शहादा l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील  सारंगखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांच्या शहादा येथील राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी एक शासकीय सर्विस पिस्टल तसेच पिस्टलचे ३० जिवंत काडतुस यांसह एक लाख ६२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील प्रेस मारुती मंदिरा जवळील दीनदयाल नगर मध्ये  सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी भाडेतत्त्वावर राहतात. भगवान कोळी पाच दिवसांपासून रजेवर होते व ते बाहेरगावी गेले होते. भगवान कोळी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या घरी परतले.

त्यावेळी बाहेरूनच त्यांना स्वयंपाक घरातील लाईट सुरू असल्याचे दिसून आले.लाईट चालू राहून गेला असा संशय त्यांना आला. मात्र, मुख्य दरवाजा जवळ आल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी आत प्रवेश केला असता सर्वत्र घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्य त्यावरून त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले एक लाख १२ हजार रुपये रोख व ५० हजार रुपये किमतीच्या दहा ग्रॅम वजनाची सोन्याचा तुकडा तसेच एक ९ एम. एम. शासकीय सर्विस पिस्टल बट-क्रमांक -३५ व तिचे ३० जिवंत काडतुसे असा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच शहाद्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पोसई जितेंद्र पाटील आदींसह पथकाने घटनास्थळी भेट देऊन रात्री उशिरापर्यंत ठसे तज्ञ व श्वानपथकाला प्राचारण करण्यात आले होते. दरम्यान अज्ञात चोरांन विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार पालिकेच्या इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून सभेत गदारोळ

Next Post

बालदिनिामित्त राट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे स्वेटर वाटप

Next Post
बालदिनिामित्त राट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे स्वेटर वाटप

बालदिनिामित्त राट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे स्वेटर वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add