नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षा-2020 शनिवार 4 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते सकाळी 12 या वेळेत घेण्यात येणार आहे.
शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल नंदुरबार, जी.टी. पाटील महाविद्यालय नंदुरबार, डी.आर. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज्युनियर कॉलेज नंदुरबार, एस. ए. मिशन (मराठी) व एस. ए. मिशन (इंग्रजी) स्कूल नंदुरबार, पी.के. पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार अशा 9 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे, तर 3 हजार 643 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. परिक्षेसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून 152 वर्गखोल्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे तसेच तहसिलदार उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 ऑगस्ट 2021 रोजी उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक,समवेक्षक अधिकारी, कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण पहिले प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन 3 सप्टेंबर 2021 रोजी परीक्षा केंद्रावर होणार आहे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.