नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील पूर्व भागात कमी पाऊस झाला असून, परिसर मोठ्या प्रमाणात दुष्काळ ग्रस्त स्थिती आहे.त्यामुळे अनेक गावकऱ्यांनी नंदुरबार तालुक्यातील खोक्राळेसह पूर्व भागात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांना निवेदन देत मागणी केली.

या निवेदनात म्हटले आहे की, खोक्राळे ता. जि. नंदुरबार या गावातील शिवारात कमी पाऊस झाला असून, परिसर मोठ्या प्रमाणात दुष्काळ ग्रस्त स्थिती आहे. पिकांची वाढ झाली नाही व पिके वाळून गेली आहेत व विहिरींना पाणी नाही, गुरे ढोरांना चारा-पाणी नाही, आत्ता या महिन्यात अशी परिस्थिती आहे. तालुक्यातील खोक्राळे, न्याहली, घोटाने, आसाने, कार्ली, बलदाने, भादवड, सैताने, रनाळे, वडबारे, सातूर्खे, वावद, चौपाळे, ढणडाणे, निंभेल -कंड्रे या गावांमध्ये दुष्काळ ग्रस्त परिस्थिती आहे. म्हणून खोक्राऴे व परिसरातील गावांमध्ये दुष्काऴ जाहीर करुन शेतक-यांना लवकरात लवकर मदत मिऴावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच गावातील शेतकरीनी मोठ्या प्रमाणात पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत विमा घेतला आहे.तरी त्याचा लाभ शेतकरीना मिळावा अशी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदरचे निवेदन नंदूरबार तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब जिल्हा-अधिकारी नंदूरबार, जिल्हा कृषी अधीक्षक निलेश भागेश्र्वर, पंतप्रधान पीक विमा प्रतिनिधी नंदूरबार, कृषी- पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद हेमलता शितोळे यांनी देण्यात आले.
यावेळी खोक्राळे, न्याहली, घोटाने, आसाने, कार्ली, बलदाने, भादवड, सैताने, रनाळे, वडबारे, सातूर्खे, वावद, चौपाळे, ढणडाणे, निंभेल -कंड्रे गावातील नागरिक उपस्थित होते.








