नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील अमृत रोड परिसरात मागील वादाच्या कारणावरून मारहाण करत तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील अमृत रोड परिसरात पंचशील ग्लास हाऊसच्या शेजारी पप्पू उर्फ संजय प्रकाश राजपूत याने मागील वादाच्या कारणातून गुंजन उर्फ भैया प्रमोद सोनवणे याला घरासमोर येऊन शिवीगाळ करत हातांबुक्याने मारहाण केली तसेच त्याच्या ताब्यातील ( एम.एच.१९, बी.व्ही.७६७४ ) या क्रमांकाच्या रिक्षातून तलवार काढून तलवारीचा धाक दाखवत जिवेठार मारण्याची धमकी देऊन तिथून त्याने पळ काढला. याबाबत गुंजन उर्फ भैया प्रमोद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पप्पू उर्फ संजय प्रकाश राजपूत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहे.