Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, आजच्या विशेष ग्रामसभेत होणार वाचन

team by team
November 10, 2022
in राज्य
0
छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, आजच्या विशेष ग्रामसभेत होणार वाचन
नंदुरबार  l
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह प्रारुप मतदार यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने गुरूवार 10 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयेाजन केले जाणार असून यादिवशी ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन केले जाईल. ग्रामसभेत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या नववधू स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल.
तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, विवाह होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती खत्री बोलत होत्या. यावेळी सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले की, छायाचित्रासह प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर, 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. यावर्षी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर या दिवशी विशेष शिबिरांचे आयेाजन केले जाणार आहे. तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला व दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी 12 व 13 नोव्हेंबर रोजी, तर 26 व 27 नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देहविक्री करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी विशेष शिबीर घेतली जातील.
तसेच तरुण मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट गाईड यांच्या सहकार्याने मतदार नोंदणीची शिबिरे राबविण्यात येणार आहे. शिवाय, मतदान नोंदणी, नाव वगळणी, मतदान तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा व्होटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करुन तसेच www.nvsp.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी व्होटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करुन तसेच www.nvsp.in या संकेतस्थळावरील उपलब्ध ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा.
1 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर प्राप्त झालेले दावे व हरकती म्हणजेच दिनांक 1 जानेवारी, 2023 रोजी ज्याची 18 वर्षे पुर्ण झालेले आहेत, असे अर्ज या मोहिमेमध्ये निर्णय घेऊन निकाली काढण्यात येतील. तर 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर प्राप्त झालेले आगाऊ अर्ज हे संबंधित अर्हता तारखेच्या संबंधित तिमाहीतील पहिल्या महिन्यात विचारात घेतले जातील आणि त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले. या मोहिमेत विद्यार्थी, महिला, दिव्यांग बांधव, जेष्ठ नागरीक, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीमधील व्यक्ती, तृतीय पंथीय व्यक्ती, देह विक्री करणाऱ्या महिला, दुर्धर आजारग्रस्त नागरीक व इतर वंचित घटकांनी नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन श्रीमती. खत्री यांनी यावेळी केले.
श्री.बागडे म्हणाले की, 1 जानेवारी 2023 रोजी ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत किंवा करणार आहेत, परंतु अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा वंचित नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करणेकरीता फॉर्म क्र. 6 चा वापर करावा. मतदार यादीतील नाव कमी करण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती मयत झाली असल्यास, स्थलांतरीत किंवा असलेल्या मतदाराचे नावावर हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म क्र. 7 चा वापर करावा. ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, वय, जन्म दिनांक व पत्ता, नातेवाईकाचे नाव इत्यादी माहितीमध्ये दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे तसेच स्थलांतर, नविन मतदार ओळखपत्र, दिव्यांग बांधवांसाठी चिन्हांकित करणे या चार प्रयोजनासाठी फॉर्म क्र. 8 भरावयाचा आहे.
वरील सर्व अर्ज ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा व्होटर हेल्पलाईन ॲप वर उपलब्ध आहे. सदरचे ॲप गुगल प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड केल्यास त्यावर मतदार यादीतील नावांचा शोध घेणे, वरीलप्रमाणे नाव नोंदणी, दुरुस्ती, नाव कमी करण्याची सुविधा, तसेच ईपीक डाऊनलोड करणे, आपले मतदान केंद्राची विस्तृत माहिती, निवडणूक विषयक चालू घडामोडी, निवडणूक निकाल व इतर विस्तृत माहिती उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

हळदाणी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी सविता गावित, जि.प.सदस्य भरत गावीत यांनी केला सत्कार

Next Post

सुचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम स्पर्धेचे आयोजन

Next Post
सुचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम स्पर्धेचे आयोजन

सुचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add