Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित

team by team
November 9, 2022
in राज्य
0
भिडे गुरुजींना नोटीस बजावून पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना पदावरून हटवा
मुंबई l प्रतिनिधी
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचे ‘प्रमोशन’ करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला ‘हलाल शो इंडिया’ आयोजकांनी रहित केल्याचे जाहीर केले. हा संघटित हिंदूंच्या सनदशीर मार्गाने केलेल्या प्रतिकाराचा विजय आहे. हा केवळ आरंभ आहे, देशातील ‘हलाल प्रमाणिकरण’ पद्धत बंद होईपर्यंत आमचा लढा चालूच राहिल, अशी प्रतिक्रिया ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’चे समन्वयक सुनिल घनवट यांनी व्यक्त केली. समितीच्या या यशाबद्दल श्री. घनवट यांनी सहभागी सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले, तसेच ईश्वरचरणी कृतज्ञताही व्यक्त केली.
मरीन लार्इन्स येथील ‘इस्लामिक जिमखाना’ येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी ‘ब्लॉसम मिडिया’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. हलाल प्रमाणपत्राद्वारे मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे लक्षात आल्यावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला.
‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली, तसेच बैठका घेण्यात आल्या. हा कार्यक्रम झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करण्याची चेतावणी समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दिली होती. ‘हलाल शो इंडिया’ रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस सहआयुक्त  विश्वास नांगरे-पाटील आणि विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैशाचा वापर कुठे केला जातो, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आदी देशांत हलाल प्रमाणपत्र आणि हलाल वस्तू यांच्या विक्रीतून मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे उघड झाले आहे. त्याप्रमाणे भारतातही हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘जमियत उलेमा-ए-हिन्द हलाल ट्रस्ट’ ने मुंबईतील ‘२६/११’चा बाँबस्फोट, झवेरी बाजारातील साखळी बाँबस्फोट, देहलीतील जामा मशीदीमधील बाँबस्फोट, पुणे येथील जर्मन बेकरी बाँबस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बाँबस्फोट, अहमदाबाद बाँबस्फोट आदी अनेक आतंकवादी कारवायांतील आरोपींना कायदेविषयक साहाय्य करत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘इंडियन मुजाहिदीन’, ‘इस्लामिक स्टेट’ अशा विविध आतंकवादी संघटनांशी संबंधित सुमारे ७०० संशयित आरोपींच्या खटल्यांना आर्थिक साहाय्य केले जात आहे.
भारतात खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्रीय संस्था ‘FSSAI’ आणि ‘FDA’ अर्थात राज्याचे ‘अन्न आणि औषध प्रशासन’ हे विभाग असतांना हिंदुबहुल भारतात वेगळ्या ‘हलाल प्रमाणपत्रा’ची सक्ती कशासाठी ? त्यामुळे ‘हलाल उत्पादनां’चे उदात्तीकरण करणार्‍या कार्यक्रमांना पोलीस-प्रशासनाने अनुमतीच देऊ नये, अशी मागणी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने सुनील घनवट यांनी केली.
बातमी शेअर करा
Previous Post

राजकीय प्रवाहामध्ये ख्रिस्ती समाज नगण्यच : अनिल भोसले

Next Post

सुरक्षा कीट विना खाजगी वायरमनचा जीव धोक्यात, महावितरणाचे दुर्लक्ष

Next Post
सुरक्षा कीट विना खाजगी वायरमनचा जीव धोक्यात, महावितरणाचे दुर्लक्ष

सुरक्षा कीट विना खाजगी वायरमनचा जीव धोक्यात, महावितरणाचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add