Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजकीय प्रवाहामध्ये ख्रिस्ती समाज नगण्यच : अनिल भोसले

team by team
November 9, 2022
in राजकीय
0
राजकीय प्रवाहामध्ये ख्रिस्ती समाज नगण्यच : अनिल भोसले

नंदुरबार l प्रतिनिधी

 

प्रेम, दया, शांतीचा संदेश देणाऱ्या ख्रिस्ती समाजाचे आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मोठे योगदान आहे. मिशनऱ्यांनी जे रोप लावले त्याचे वृक्षात रूपांतरही झाले. परंतु सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व राजकीय प्रवाहामध्ये आजही ख्रिस्ती समाज नगण्य असल्याची खंत महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी व्यक्त केली. नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृह मध्ये झालेल्या सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.

 

 

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास वळवी, लक्ष्मण पाडवी, सतीश वळवी सुरज गावित, सुमन गावित, जयंतीला गावित, बाळू आदी मान्यवर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

 

भोसले पुढे म्हणाले, ख्रिस्ती समाज राजकीय व सामाजिक प्रवाहामध्ये आत्तापर्यंत प्रामाणिकपणे उभा राहिला आहे. परंतु समाजाच्या भावनांचा आदर होताना अजूनही दिसून येत नाही. ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा येथे महाराष्ट्रातील मराठी ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी शोधूनही सापडत नाही. तमाम ख्रिस्ती बांधवांना आता विचार करायला लावणारी वेळ आली असून, समाजाचे विविध प्रश्न मागण्या आजही प्रलंबित आहेत.

 

 

 

 

 

महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगामध्ये प्रतिनिधित्व, पंतप्रधानांच्या १५ कलमी अल्‍पसंख्‍यांक विकास कार्यक्रमांमध्ये जिल्हा पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत नेमणुका व्हाव्यात, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळावर प्रतिनिधित्व, महाराष्ट्रीय अनुसूचित ख्रिश्चनांना राजकारणात प्रतिनिधित्व दिले जात नाही. मूळ मागास प्रवर्गातील धर्मांतरितांना नोकऱ्या उच्च शिक्षणामध्ये आरक्षणाचा अभाव, ख्रिस्ती मिशन प्रॉपर्टी बोर्डची स्थापना व्हावी, ख्रिस्ती समाजावर दिवसेंदिवस होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनाबाबत न्याय मिळत नाही, गाव पातळीवरील रेशनिंग कमिटी, तंटामुक्ती कमिटी, यामध्ये समाजाचा अंतर्भाव व्हावा.

 

 

 

 

तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने यापुढील काळात एकाच व्यासपीठावर येऊन लढा उभारल्याशिवाय न्याय मिळणार नाही. आता सुज्ञ तरुणांनी गांभीर्याने विचार करून योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे वरील मागण्या संदर्भात लवकरच महाराष्ट्रातील सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाचे शिष्टमंडळ महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांची भेट घेऊन समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष वेधून आग्रही मागणी करणार आहे. येणाऱ्या काळात समाजाच्या न्याय हक्कासाठी मोठं जनआंदोलन उभे करण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

या बैठकीस राजू गावित, ईश्वर गावित, प्रफुल साने, प्रा. फिलिप गावित, संजय मावची, याेसेफ पाडवी, याकोप गावित, मनोहर गावित, सरपंच दिनकर, डॉ.निलेश वळवी आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. शेवटी विश्वास वळवी यांनी सर्वांच्या आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे दोन लाखाचा गुटखा जप्त

Next Post

तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित

Next Post
भिडे गुरुजींना नोटीस बजावून पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना पदावरून हटवा

तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add