नंदुरबार l प्रतिनिधी
येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नोटबंदीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नोटबंदीमुळे बळी गेलेल्या निष्पाप नागरीक, काळ्या धनाच्या घोषणा केलेल्या टोकरीला, गुजरातमध्ये जुन्या नोटांचा काळाबाजार करणार्या धनीकांच्या विचारांसह हुकूमशहाने २०१४ नंतर अनेक निर्णय घेतले त्यांच्या अंमलबजावणीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
८ नोव्हेंबर २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करून देशातील स्थिर अर्थकारणाची हत्या केली. आज सहा वर्ष सरली तरी दुखवटा मात्र सरला नाही. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे ‘नोटाबंदीला श्रद्धांजली’ वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप तसेच
नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे यांच्यातर्फे दि.८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता शहरातील शिरीषकुमार मेहता स्मारक चौकात मेणबत्त्या घेवून शांततापूर्ण वातावरणात नोटबंदीला श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, युवक तालुकाध्यक्ष दिनेश माळी, महिला आघाडी शहराध्यक्षा उषाताई वळवी, कालू पहेलवान, रुपेश जगताप, बच्छाव नाना, राजा ठाकरे, जय मोरे, मिलिंद जाधव, गणेश मराठे आदी उपस्थित होते.