शहादा l प्रतिनिधी
मोलगी शहराला तालुक्याच्या दर्जा मिळावा याबाबत चे निवेदन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ मोलगी यांनी मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी हे महत्त्वाचे मुख्य बाजारपेठ असलेले शहर आहेत.त्यामुळे मोलगी शहराच्या परिसरातील जवळपास 80 ते.85 ग्रुप ग्रामपंचायती येत असून.सातपुडयातील प्रत्येक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
त्यासाठी मोलगी शहराला तालुक्याच्या दर्जा मिळावा यासाठी सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ मोलगी यांच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित .खा. डॉ. हिना गावित यांना अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी वेळी निवेदनावर सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ मोलगीचे ॲड. गजमल वसावे (अध्यक्ष) सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ मोलगी, ॲड. राज्या पाडवी,ॲड. जेठया वळवी,डॉ .वसंत पाडवी,अँड.जितेंद्र वसावे,ॲड. फुलसिंग वळवी उपस्थीत होते.