शहादा l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आयोजित अविष्कार 2022 जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन शहादा येथील वसंतराव नाईक कला आणि विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले होते. या संशोधन स्पर्धेत शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवले.
अविष्कार 2022 या स्पर्धेत महाविद्यालयातील 26 स्पर्धकांनी 54 संशोधन विषय सादर केले. त्यातील 16 संशोधन विषय आणि 23 विद्यार्थी व 6 शिक्षकांची विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.पदवी श्रेणीतून निवडलेले विद्यार्थी निकिता माळी. रोहन दवले, सोनल पाटील, सरस्वती सुळे, सोनू कुसवाह, रोहितकुमार चौहान, हितेश मोरे अवंतिका पवार, प्रेमप्रतिक बेलदार आणि पल्लवी जाधव.
पदव्युत्तर श्रेणीतून निवड झालेले विद्यार्थी केशव पावरा, दशरथ पावरा,तृप्ती ठाकरे, अपेक्षा बोरसे, विजय पाटील, ज्योती व्यास, गितांजली पाटील, निवृत्ती पाटील आणि प्रवीण ढोले. संशोधन विद्यार्थी श्रेणीतून निवड झालेले विद्यार्थी अन्सीलाल सुळे, योगेश विसपुते, विलास पावरा आणि सागरभाई पटेल संशोधन शिक्षक श्रेणीतून निवड झालेले शिक्षक. प्रा. राजेंद्र पाटील, प्रा. अनिल बेलदार, प्रा. महेश जगताप. प्रा. निलेश आठवले, डॉ. सतीश भांडे आणि डॉ. योगेश वासू,सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पटेल, सचीव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. पाटील यांनी कौतुक केले आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील संशोधन मंडळ आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.