तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुका कॉंग्रेस कमेटीच्या प्रभारी तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र रेवानगर येथिल नाथ्या खाज्या पावरा यांना नंदुरबार कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आ. शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक यांनी नुकतेच त्यांना दिले.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, रोहिदास पाडवी यांनी तळोदा तालुका कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर जिल्हा अध्यक्ष यांनी नाथा खाज्या पावरा यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र दिले.श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, व अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा तालुक्यात कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहू सदर हे काम करीत असतांना तालुक्यातील सर्व कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पक्ष वाढवून आपण दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन अशी ग्वाही नाथ्या खाज्या पावरा यांनी दिली.








