Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना कोविड नियम फक्त सर्व साधारण सभेप्रसंगीच आठवतो का ? भाजपा नगरसेवकांचा सवाल

Mahesh Patil by Mahesh Patil
August 31, 2021
in राजकीय
0
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना कोविड नियम फक्त सर्व साधारण सभेप्रसंगीच आठवतो का ? भाजपा नगरसेवकांचा सवाल

नंदुरबार | प्रतिनिधी
शेकडो लोकांच्या एकत्रित बैठका, जेवणावळी नियमितपणे घालणारे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना कोविड नियम फक्त सर्व साधारण सभेप्रसंगीच का आठवतो? असा प्रश्‍न करीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी दि.३ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित केलेली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याला कडक विरोध केला आहे. शहरात बोकाळलेल्या विविध समस्यांवर प्रत्यक्ष चर्चा होऊच नये आणि जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर द्यावे लागू नये म्हणून कोविड नियमांचा बहाना करून ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्याचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी अनेक महिन्यांपासून ऑनलाईन सभेचे चालवलेले नाटक केवळ जमिनींचे लेआऊट मंजूर करवून घेण्यासाठीच रचले जात आहे, असा आरोपही या नगरसेवकांनी एका निवेदनाव्दारे केला आहे.
यासदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी यांना तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी जनतेच्या वतीने निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की,  जनतेच्या समस्या खुल्यापणाने मांडता याव्यात, सोडवता याव्यात तसेच जनतेच्या वतीने विरोधी नगरसेवकांना सभागृहात बोलता यावे यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे प्रयोजन असते. परंतु कोविड नियमांचा बाऊ करून प्रत्यक्ष उपस्थितीत (ऑफलाईन) सर्वसाधारण सभा घेण्याचे सलगपणे टाळून नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी आणि त्यांचे पती माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधी पक्षाच्या व पर्यायाने जनतेच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली चालवली आहे. दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कोविड नियमांचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन घेण्याचा प्रकार यातलाच आहे.
एकीकडे संपूर्ण राज्यात कोविड संसर्ग होणार नाही याची दक्षता घेत लोक खुल्यापणाने व्यवहार करू लागले आहेत. नंदुरबारमधेही शासकीय कार्यालये, बाजारपेठा सुरळीत चालल्या आहेत. स्वत: माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी झराळी येथील फार्म हाऊसवर ते स्वत: शेकडो जणांना प्रत्यक्ष उपस्थित ठेऊन मागील अनेक दिवसांपासून बैठका, जेवणावळींचा रतिब घालत आहेत. मग नगरपालिका सभेलाच कशी काय प्रत्यक्ष उपस्थितीची बाधा होते? नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जनतेच्या प्रश्‍नांना फाटा देऊन ठेकेदारी संबंधीत विषयांना तसेच जमिन ले आऊट विषयांना आणि आरक्षण बदलाला मंजूरी देण्याचे कारस्थान पार पाडता यावे एवढ्यासाठीच हे घडवले जात आहे. प्रत्येक सभेच्या अजेंड्यावरील विषयांमधून तसे दिसून येते. म्हणून आतापर्यंत झालेल्या अशा सामुहिक बैठकांविषयी तसेच ऑनलाईन सभांविषयी त्वरीत चौकशी लावावी आणि कडक कारवाई करण्यात यावी.
श्री.रघुवंशी यांनी नगरपालिकेच्या गाळेधारकांना कोविड काळात भाड्यात सुट देण्याचा खोटा ठराव मंजूर केला मात्र या वर्षी माफ केलेले भाडे परत बिलात लावून गाळेधारकांचा विश्वासघात केला. मोठा मारूती ते मंगळ बाजार परीसरातील नागरीक नरकाचे जिवन जगत आहेत. त्यांच्या समस्या अजूनही जाणीवपूर्वक  सोडवल्या नाहीत. शहरातील वाढते अतिक्रमण कधी काढणार ? कुत्र्यांच्या हल्ल्यात अजुन कीती बळी पडणार? मोकाट जनावरे, ऊघड्या गटारी,बंद पडलेली भुमीगत गटार योजना याची दखल का घेत नाहीत? स्वत:च्या ईमारती व भुखंडांना, सि.बी. गार्डन, छत्रपती नाटृयगृह, इंदिरा मंगल कार्यालय व सर्व कराराने दिलेल्या वास्तूंना दिलेली करमाफी व शहरातील नागरीकांवर लादलेला कराचा बोजा यातून कधी सुटका करणार? याचे उत्तर जनतेला हवे असल्याने जिल्हाप्रशासनाने नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांना रितसर सूचना देऊन सर्वसाधारण सभा खुल्या वातावरणात घेण्यासाठी बाध्य करावे आणि घटनादत्त अधिकारांचे रक्षण करावे, ही जनतेच्या वतीने मागणी आहे. जनतेच्या वतीने उपस्थित होणार्‍या वरील मुद्यांना उत्तर द्यायची हिम्मत दाखवून सर्वसाधारण सभा खुल्या वातावरणात घेऊन दाखवावी असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर विरोधी पक्षनेता चारूदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी,गौरव चौधरी,निलेश पाडवी, संगिता सोनवणे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ऊस तोडण्यासाठी मजुर उपलब्ध करून दिले नाहीत म्हणून मजुराच्या मुलासह दोघांचे अपहरण, पुणे येथील ठेकेदारा विरुद्धगुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group