नंदुरबार l प्रतिनिधी
ऊस तोडण्याचे मजुर उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेले २ लाख २० हजार रूपये परत केले नाही. व मजूरही उपलब्ध केले नाहीत.म्हणून मजुराच्या मुलासह एकाचे ठेकेदाराने अपहरण करून पुणे येथे डांबून ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी ठेकेदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील मालदा येथील चंद्रसिंग गणा मावची यांनी ऊस तोडण्याचे मजुर उपलब्ध करून देण्यासाठी ठेकेदार संजय पवार यांच्याकडून २ लाख २० हजार रूपये घेतले होते.ऊस तोडण्याचे मजुर उपलब्ध करून दिले नाही व दिलेले पैसे परत केले नाही. म्हणून संजय पवार याने चंद्रसिंग गणा मावची यांचा मुलगा संतोष चंद्रसिंग मावची व सोबत काम करणारे बापू जाधव दोन्ही रा . रनाळे ता . जि . नंदुरबार यांना दि. ३० ऑगस्ट रोजी प्रकाशा येथून प्रकाशा येथून रनाळे सोडून देतो असे सांगून त्यांचे अपहरण करत पुणे येथे घेऊन गेला.याप्रकरणी चंद्रसिंग गणा मावची रा . मालदा ता . तळोदा यांच्या फिर्यादीवरुन संजय पवार रा . चिंचणी पो . नावडा ता . शिरूर जि . पुणे व सोबत दोन इसम ( नाव गाव माहित ) यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भा.द.वी. ३६५, ३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोसई विक्रांत कचरे करीत आहेत.