नवापूर l प्रतिनिधी
खांडबारा ता.नवापूर येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावरून दोन तरूणी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपला घरी जात असतांना शनिवारी एका युवकाने अंधाराचा फायदा घेत तरुणींची छेडछाड केल्याने या तरुणीने त्या युवकाला न घाबरता चांगलेच झोडपले . तरुणाला मारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की ,खांडबारा ता.नवापूर येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावरून दोन तरूणी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपला घरी जात असतांना एका युवकाने अंधाराचा फायदा घेत तरुणींची छेडछाड केली.यावेळी मुलींची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्या युवकाला पकडून त्याची विचारपूस केली असता तो दारूच्या नशेत दिसून आला . मी युवतीची छेडछाड केली नाही चूक झाली असे सांगितले , त्यानंतर खोटे बोलत असल्याने पुन्हा त्या युवतीने त्या युवकाच्या कानशिलेत चार – पाच थापडी मारल्या . परिसरातील नागरिकांनी मुलींची छेडछाड करीत असल्याचा आरोप करत त्या युवकाला चांगला चोप दिला . खांडबारा गावातील स्टेशन रोडवर मुलींची छेडछाड करीत असलेला तरुणाचा निडरपणे त्यांनी सामना केला . त्यांच्या निडरपणाचे कौतुक केले जात आहे .याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासंदर्भात विसरवाडी पोलिस ठाण्यात कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नाही .