नंदूरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हा पुढील वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखरच्या मोहिमेला जाणार आहे.त्यापूर्वी त्याने धडगाव तालुक्यातील ४ हजार फूट उंचीवर असलेल्या अस्तंबा ऋषींचे दर्शन घेत भारतीय ध्वज फडकवत सामूहिक राष्ट्रगीताचा गायन केले.
अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे याने कोरोना काळानंतर युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस सर करून विश्वविक्रम केला होता.
तसेच अनिल वसावे यांनी २०२१ मध्ये केलेली ही दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम होती.

२६ जानेवारी २०२१ रोजी ही अनिल वसावे याने आफ्रिका खंडातील माऊंट किलोमांजरो हे शिखर सर केले होते.
माऊंट सतोपंथ हे हिमालयाच्या गढवाल श्रेणीतील प्रमुख शिखरांपैकी एक आहे. ते भारतीय उपखंडात येते आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यानातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे. हे ७ हजार ७५ मीटर शिखर अनिल वसावे याने सर केले.
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हा पुढील वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखरच्या मोहिमेला जाणार आहे.त्यापूर्वी त्याने धडगाव तालुक्यातील ४ हजार फूट उंचीवर असलेल्या अस्तंबा ऋषींचे दर्शन घेत भारतीय ध्वज फडकवत सामूहिक राष्ट्रगीताचा गायन केले.या यावेळी सुनिल गावीत, महेश घूले, पंकज वळवी, सचिन वसावे, विनोद वसावे, नरपत वसावे, राहुल वसावे सुनिल पाडवी आदी उपस्थित होते.








