नंदूरबार l प्रतिनिधी
सातपुड्यातील सर्वोच्च शिखरावर व दिपावलीच्या पर्वावर भरणारी अश्वत्थामा ऋषिंची यात्रा भरत असते. गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सिमेलगतच्या परिसरात लाखो भाविक हजेरी लावत असल्याने यात्रेला जाणाऱ्या भाविकांमुळे सातपुड्यातील टेकड्या भाविकांनी फुलतात यात्रेची प्रारंभ तळोद्यापासूनच होते. व समारोप येथील हनुमान मंदिरात मारुतीरायाचे दर्शन घेवून होते.

तळोदा परिसरातील एक दिवस शेतशिवारत मळ्यात विश्रांति घेतात लक्ष्मीपूजन च्या दिवशी सकाळी आठ पासून गटागटाने कागद पासून बनविन्यात आलेले घोड़े, राम सीता लक्ष्मण, हनुमान, भोलेनाथ, विविध ऋषी मुनी विविध देविदेवताचे रूप यासह विविध वेशभूषा करीत सोंगे घेवून डफ़ ताश्यांच्या तालावर वाजत गाजत येथील कॉलेज रोड पासून गटागटाने मिरवणुकीत सहभागी होत असतात.

दिवसरभर मिरवणुका काढीत मारोतीरायाचे दर्शन घेतात या भव्य मिरवणुकीने डफ़ ताश्याच्या आवाजाचा गजराने शहर दणाणुन निघाले होते. यात्रा समारोप पहाण्यासाठी तळोदा शहर व तालुका परिसरातून हजारो अबाल, वृद्ध, महिला नागरिक येत असतात. यामुळे एकप्रकारे यात्रेचे स्वरूप येते.








