Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विशेष माहिती : पावभा ऋषींच्या यात्रोत्सवास हजारो भाविकांची उपस्थिती, अशी अख्यायीका आहे प्रसिध्द

team by team
October 25, 2022
in सामाजिक
0
विशेष माहिती : पावभा ऋषींच्या यात्रोत्सवास हजारो भाविकांची उपस्थिती, अशी अख्यायीका आहे प्रसिध्द
नंदुरबार  l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावभा ऋषींच्या यात्रोत्सवास सुरूवात झाली असुन खांन्देशातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले.गेल्या दोन वर्षांपासुन बंद असलेल्या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थीती लावली होती.
खांन्देशातील प्रसिध्द असलेल्या यात्रामध्ये नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावभा ऋषींच्या यात्रोत्सवाचा समावेश आहे.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासुन यात्रेस खंड पडला होता.मात्र यंदा मोठ्या उत्साहात यात्रोत्सव भरला.या बाबत एक अख्यायीका आहे.
त्यामुळे भाविक व सेवेकरी यात्रेत सहभागी होऊ लागले.हळुहळु यात्रेचे स्वरूप मोठे होत गेले. पावभा ऋषीच्या सेवेकरी रात्रभर जागून पावभा ऋषीच्या जीवनपटावर ओव्या गाऊन ओव्या रूपात गाऊन डांख्याच्या व वाजंत्रीच्या तालावर मंदिर परिसरात नंदुरबार,धुळे,जळगाव जिल्ह्यातील पावभा ऋषीचे सेवेकरी आपल्या सहकार्‍यांसमवेत रातभर जागरण करतात,ज्याभाविकेची इच्छा पूर्ण झाली तेही कुटुंबासमवेत थांबतात येथून दुसर्‍या दिवशी सर्व सेवा करी भावी भक्त पावभाच्या दर्शनासाठी अक्राळे गावाकडे  निघतात,येथे नवस्फूर्ती करतात .
नाशिंदे येथे १९९२ च्या जवळपास मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. १९९९ साली डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधीतून सभामंडप बांधण्यात आले.येथील श्री पावभा व राजबाई संस्था संस्था नाशिंदा यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराच्या परिसरातील भाविकांसाठी विविध सोय उपलब्ध करून दिले आहेत असे माहिती श्री.पावभा ऋषी राजबाई संस्थान नाशिंद्यांचे अध्यक्ष छबिलाल पाटील व उपाध्यक्ष व्यंकट पाटील यांनी दिली. यात्रेत लहान मोठे पाळणे, लहान मुलांच्या खेळण्याची दुकाणे, नारळ, प्रसादाची दुकाने यात्रेत दाखल झाली आहेत. यावर्षी  तिथीत वाढ असल्याने दोन दिवसापर्यंत नवस फेडले जात आहेत.हजारो भाविकांची उपस्थीतीत होते. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शन घेत नवास फेडले.
 पावभा ऋषींबाबत अशी अख्यायीका आहे प्रसिध्द  
पावभा ऋषी काठोबा देवाचे भक्त होते.पावभा ऋषीचे मुळगाव नामपुर मोराणे ता.सटाणा तर मामाचे गाव धमणार ता.साक्री व सावत्र मामाचे गाव डांगुर्णे ता.शिंदखेडा,सावत्र मामा पावभा ऋषींना डांगुर्ण येथे घेऊन गेले. त्यानंतर पावभांनी बारा वर्षाच्या वयापासून भक्ती सुरू केली. पावभा ऋषींनी बारा,बारा वर्षाचे तीन तप केले.या तपात्या जोरावर इंद्राचे आसन डोलामान झाले. तपास तीन दिवस शिल्लक असताना नारदाने पावभा ऋषींची पत्नी मोहिनी यांना सांगीतले कि, पावभा ऋषीचे तप पूर्ण झाले आहे.तर तुम्हाला मढीत जायला काही हरकत नाही.
त्यांच्या सांगण्याप्रमाणे पत्नीने मढीत प्रवेश केला श्री च्या पैंजणाचे आवाजाने पावभा ऋषींचे तप खंडित झाले.वैराग्यात पावभा ऋषी खापरखेडा ता.नंदुरबार येथील पोलीस पाटील मित्र गहिबू पाटील  यांच्याकडे निघाले.येतांना रात्र झाली.खापरखेडा येथे पोहोचल्यावर त्यांनी यांच्या घराचा दरवाजा ठोकला आवाज दिला मात्र घरातून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने रागात त्यांनी शाप दिला. खापरखेडा गाव उजाड होईल. त्यांनी शाप देऊन तापी काठावरील विश्वतीर्थावर येऊन तापी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली.
पावभा ची बहिण आराळे ता.शिंदखेडा येथे दिली होती. रात्री बहिणीच्या स्वप्नात जाऊन मी जलसमाधी घेतली असे स्वप्नात सांगितले, बहीण राजबाई या सकाळी डांगुर्णे गावाकडे निघाली डांगुर्णे येथे पोहोचून मढीत भावाला शोधू लागले लागली. भाऊ नसल्याने विचारणा केली भाऊ वैराग्यात निघून गेला अशी माहिती मिळाल्याने भाऊ कुठे गेला असेल असा विचार करू लागली, बहिणीच्या लक्षात आले की,भावाचा एक मित्र खापरखेडा येथे राहतो त्याच्याकडे गेला असेल त्यामुळे भावाचा तपास करण्यासाठी खापरखेडा गावाकडे निघाली तेथील भीवल्या कोळी नंदुरबार येथील जेलमध्ये होता.
त्याच्या स्वप्नात जाऊन पावभा ऋषींनी सांगीतले कि,मी जलसमाधी घेतली आहे व माझे प्रेत नाशिंदे गावाच्या काठावर आले आहे. सकाळी भीवल्या कोळी यांनी ब्रिटिश पोलीस अधिकार्‍यांना स्वप्नातील घटना सांगितली व मला खापरखेडा येथे जाऊ द्या म्हणून विनंती केली. मात्र भीवल्या कोळी हा पळून जाईल अशी पोलिसांना भीती वाटत असल्याने, पोलीस फौज फाटा व भिवल्या कोळी खापरखेडा येथे पोहोचले. भिवल्या कोळी नदीपात्रात उतरल्यावर काही अंतरावरच त्यांना पावभा ऋषींचा देह सापडला त्यांनी तो बाहेर काढला तोपर्यंत राजबाई ही परिसरात तपास करत असतांना गर्दी पाहून तापी नदीकडे निघाली. नदी काठावरच भावाने येथेच जलसमाधी घेतली याची खात्री पटली.
भीवल्या कोळीने देह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर राज बाईच्या मांडीवर दिला बहिणीने भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन तापी नदीचे जलसमाधी घेतली. तेथून ं दोघांच्या प्रेत नाशिंदे येथे आणण्यात आले. तेथेच लहान मंदिर बांधण्यात आले असल्याची आख्यायिका प्रमाणे साडेचारशे पेक्षा जास्त वर्षे झाल्याची माहिती पावभा ऋषीचे सेवेकरी भगत रामदास दंगल धनगर रा.अंबाडे, ता.चोपडा यांनी सांगितले तेव्हापासून येथे अश्विनी शुद्ध चौदस रोजी यात्रा भरण्यास सुरुवात झाली.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे विविध वेशभूषेतील भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

Next Post

नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add