नंदुरबार l
शहरातील देसाईपुरा भागातील घरातून चोरट्याने सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी दोघा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील सुनिता रमेशचंद्र बुवा यांचे शहरातील गणपती मंदिर परिसरात देसाईपुरात घर आहे. सदर घरात दोन अनोळखी इसमांनी प्रवेश करुन कपाटातून १ लाख २९ हजार ६०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
याबाबत सुनिता बुवा यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोघा अनोळखी इसमांविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.बी.मोहिते करीत आहेत.








