नंदुरबार l प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणूकीत सहकार्य केले नाही या रागातून महिलेला लाकडी डेंगार्याने मारहाण करुन जखमी केल्याची घटना गोरंबा गावी घडली. याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील गोरंबाचा एडीपाडा येथील इंद्रा सोना मोरे या महिलेच्या पतीने ग्रामपंचायत निवडणूकीत संशयीतांना सहकार्य केले नाही. याचा राग आल्याने भगतसिंग जिर्या वळवी याने लाकडी डेंगार्यान इंद्रा मोरे या महिलेला मारहाण केली. तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत इंद्रा सोना मोरे यांनी धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगतसिंग जिर्या वळवी, ईश्वर जिर्या वळवी, जिर्या सिमा वळवी, देवसिंग तेजला नाईक, रामसिंग सिमा वळवी, फुद्या सिमा वळवी या 6 जणांविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ. स्वप्नील गोसावी करीत आहे.








