नंदुरबार प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान यावेळी जि.प.सभापदीपदाची निवड रंगतदार होणार असून सत्ताधारी व विरोधकांनी प्रत्येकी पाच अर्ज खरेदी केले आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेत नाटयमयरित्या घडामोडी घडून भाजपाच्या डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विजयी झाल्या तर काँग्रेसचे सुहास वेच्या नाईक हे भाजपा व त्यांच्या समर्थकांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापुर्वी स्थापन झालेली महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली असून जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.दरम्यान जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापदीपदाच्या निवडीसाठी 20 ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेस कडून समाज कल्याण सभापती पदासाठी काँग्रसचे रतन खात्र्या पाडवी, महिला बालकल्याण सभापती पदासाठी हिराबाई रविंद्र पाडवी, विषय सभापती पदासाठी काँग्रेसचे अजित सुरूपसिंग नाईक, निर्मला सीताराम राऊत, देवमन पवार यांचे अर्ज खरेदी करण्यात आले.
तर भाजपा व समर्थकांतर्फे समाज कल्याण सभापती पदासाठी उबाठा शिवसेनेचे शंकर आमश्या पाडवी, महिला बालकल्याण सभापती पदासाठी संगीता भरत गावीत, विषय सभापती पदासाठी उबाठा शिवसेनेचे गणेश रुपसिंग पराडके, भाजपाच्या ऐश्वर्यादेवी जयपालसिंग रावल, जयश्री दीपक पाटील, काँग्रेसच्या हेमलता अरुण शितोळे यांचे अर्ज खरेदी करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेत चार सभापतींची निवड असून सत्ताधारी व विरोधकांनी प्रत्येकी पाच अर्ज खरेदी केले आहेत.त्यामुळे सभापतींची निवडी साठी मतदान होईल हे नक्की झाले आहे.त्यामुळे तीन वाजेला होणाऱ्या निवडी नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.