तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. यात सरपंचासह भाजपचे १२ सदस्य निवडून आले आहेत. पंचायत समिती उपसभापती विजय राणा यांची खेळी यशस्वी.
१७ ऑक्टोबर २०२२ रोजी तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून बोरद ग्रामपंचायती वर प्रथमच भाजपाने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.
बोरद ग्रामपंचायतीवर स्थापनेपासून आजपर्यंत या नेहमी काँग्रेस तसेच इतर पक्षांची सत्ता होती.काहीवेळा भाजपचे सदस्य ही निवडून आले मात्र सदस्य संख्या कमी असल्याने सत्तेत त्याचे रुपांतर होऊ शकले नाही. परंतु ग्रामपंचायत स्थापने पासून आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेसने आपली सत्ता कधीच गमावली नाही मात्र यावर्षी आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरद येथील तळोदा पंचायत समितीचे उपसभापती विजय राणा यांच्या नेतृत्वाखाली बोरद ग्रामपंचायत निवडणूक भाजपातर्फे लढविण्यात आली यामध्ये विजय राणा यांनी संपूर्ण ग्रामपंचायतिचा यशस्वी सर्वे करून तरुण आणि तडफदार उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानुसार गावाचा कल जाणून घेत त्यांनी गेल्या वीस वर्षापासून भाजपामध्ये सक्रिय असलेले रवीन भिलाव यांच्या पत्नी अनिता भिलाव यांना सरपंच पदासाठी उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्याचबरोबर तरुणांना सदस्य पदासाठी संधी देत एकूण १२ सदस्य निवडून आणण्यात त्यांची रणनीती प्रभावी ठरली आहे.
याबाबत विजय राणा यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की पत्नी पराभूत झाल्याचे दुःख नाही परंतु त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ सदस्य मंगेश भुता पाटील यांचा प्रभाग क्रमांक २ मध्ये पराभव झाल्याने त्यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की गड आला पण सिंह गेला त्यामुळे आम्ही मंगेश पाटील यांच्या पराभवाने दुःखी आहोत अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली.
त्याच बरोबर गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास हा आच्या प्रत्येक कामात आम्हाला प्रोत्साहन देत राहील असा आदर भाव व्यक्त केला.