Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्थापनेनंतर बोरद ग्रामपंचायती वर प्रथमच भाजपाची सत्ता

team by team
October 20, 2022
in राजकीय
0
स्थापनेनंतर बोरद ग्रामपंचायती वर प्रथमच भाजपाची सत्ता
तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. यात सरपंचासह भाजपचे १२ सदस्य निवडून आले आहेत. पंचायत समिती उपसभापती विजय राणा यांची खेळी यशस्वी.
 १७ ऑक्टोबर २०२२ रोजी तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून बोरद ग्रामपंचायती वर प्रथमच भाजपाने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.
              बोरद ग्रामपंचायतीवर स्थापनेपासून आजपर्यंत या  नेहमी काँग्रेस तसेच इतर पक्षांची सत्ता होती.काहीवेळा भाजपचे सदस्य ही निवडून आले मात्र सदस्य संख्या कमी असल्याने सत्तेत त्याचे रुपांतर होऊ शकले नाही.  परंतु ग्रामपंचायत स्थापने पासून आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेसने आपली सत्ता कधीच गमावली नाही मात्र यावर्षी आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरद येथील तळोदा पंचायत समितीचे उपसभापती विजय राणा यांच्या नेतृत्वाखाली बोरद ग्रामपंचायत निवडणूक भाजपातर्फे लढविण्यात आली यामध्ये विजय राणा यांनी संपूर्ण ग्रामपंचायतिचा यशस्वी सर्वे करून तरुण आणि तडफदार उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानुसार गावाचा कल जाणून घेत त्यांनी गेल्या वीस वर्षापासून भाजपामध्ये सक्रिय असलेले रवीन भिलाव यांच्या पत्नी अनिता भिलाव यांना सरपंच पदासाठी उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्याचबरोबर तरुणांना सदस्य पदासाठी संधी देत एकूण १२ सदस्य निवडून आणण्यात त्यांची रणनीती प्रभावी ठरली आहे.
   याबाबत विजय राणा यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की पत्नी पराभूत झाल्याचे दुःख नाही परंतु त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ सदस्य मंगेश भुता पाटील यांचा प्रभाग क्रमांक २ मध्ये पराभव झाल्याने त्यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की गड आला पण सिंह गेला त्यामुळे आम्ही मंगेश पाटील यांच्या पराभवाने दुःखी आहोत अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली.
  त्याच बरोबर गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास हा आच्या प्रत्येक कामात आम्हाला प्रोत्साहन देत राहील असा आदर भाव व्यक्त केला.
बातमी शेअर करा
Previous Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज

Next Post

ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post
ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add