नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेत नाटयमयरित्या घडामोडी घडून भाजपाच्या डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विजयी झाल्या तर काँग्रेसचे सुहास वेच्या नाईक हे भाजपा व त्यांच्या समर्थकांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापुर्वी स्थापन झालेली महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली असून जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापदीपदाच्या निवडीसाठी 20 ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागते या कडे जिल्हा वासींयांचे लक्ष लागुन आहे. यात भाजपा दोन बाउठा शिवसेनेला एक तर राष्ट्रवादीच्या सदस्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवीण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाच्या उर्वरित कालावधीसाठी विषय समिती सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवार 20 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेकरीता उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) नितीन सदगीर हे पिठासन अधिकारी असतील. सभापती पदासाठी जिल्हा परिषदेमधील सदस्य व पंचायत समितीतील सभापती हे मतदान करणार आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दि.17 ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यात डॉ.सुप्रिया गावित यांना 31 तर ॲड.सीमा वळवी यांना 25 मते मिळाली. त्यामुळे डॉ.सुप्रिया गावित यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच उपाध्यक्षपदासाठी सुहास नाईक यांना 31 तर ॲड.राम रघुवंशी यांना 25 मते मिळाल्याने सुहास नाईक यांना विजयी घोषीत करण्यात आले. विषय समिती सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवार 20 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात भाजपा कडुन नवापूर तालुक्यातुन जि.प.सदस्या सौ.संगिता भरत गावित, शहादा तालुक्यातुन जि.प.सदस्या सौ.जयश्री दीपक पाटील किंवा सौ.ऐश्वर्या जयपालसिंग रावल यांच्या पैकी एकाची सभापती पदासाठी वर्णी लागु शकते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माजी कृषि सभापती गणेशदादा पराडके यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान काही घडामोडी घडल्यास शंकर आमश्या पाडवी यांचीही वर्णी लागु शकते.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहन शेवाळे किंवा काँग्रेसच्या हेमलता शितोळे यांच्या गळ्यातही सभापती पदाची माळ पडु शकते.दरम्यान 20 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडीत नंदुरबार जिल्हा परिषदेत काय नाटयमयरित्या घडामोडी घडतात त्यांनतरच चित्र स्पस्ट होणार आहे.जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत पाच मतांचा फरक होता मात्र यावेळी फक्त दोन मतांचा फरक दिसत आहे.त्यामुळे काय घडेल हे सांगणे कठीण आहे.








