Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.सभापदीपदाच्या निवडीसाठी 20 ऑक्टोंबर रोजी सभा, यांना मिळु शकते संधी

team by team
October 19, 2022
in राजकीय
0
नंदूरबार जि. प. च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काँग्रेसने सदस्यांना बजावला व्हीप

नंदुरबार l  प्रतिनिधी

 

 

नंदुरबार जिल्हा परिषदेत नाटयमयरित्या घडामोडी घडून भाजपाच्या डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विजयी झाल्या तर काँग्रेसचे सुहास वेच्या नाईक हे भाजपा व त्यांच्या समर्थकांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापुर्वी स्थापन झालेली महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली असून जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.

 

 

दरम्यान  जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापदीपदाच्या निवडीसाठी 20 ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागते या कडे जिल्हा वासींयांचे लक्ष लागुन आहे. यात भाजपा दोन बाउठा शिवसेनेला एक तर राष्ट्रवादीच्या सदस्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवीण्यात येत आहे.

 

 

 

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाच्या उर्वरित कालावधीसाठी विषय समिती सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवार 20 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेकरीता उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) नितीन सदगीर हे पिठासन अधिकारी असतील. सभापती पदासाठी जिल्हा परिषदेमधील सदस्य व पंचायत समितीतील सभापती हे मतदान करणार आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी  दि.17 ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

यात डॉ.सुप्रिया गावित यांना 31 तर ॲड.सीमा वळवी यांना 25 मते मिळाली. त्यामुळे डॉ.सुप्रिया गावित यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच उपाध्यक्षपदासाठी सुहास नाईक यांना 31 तर ॲड.राम रघुवंशी यांना 25 मते मिळाल्याने  सुहास नाईक यांना विजयी घोषीत करण्यात आले. विषय समिती सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवार 20 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

यात भाजपा कडुन नवापूर तालुक्यातुन जि.प.सदस्या सौ.संगिता भरत गावित, शहादा तालुक्यातुन जि.प.सदस्या  सौ.जयश्री दीपक पाटील किंवा सौ.ऐश्वर्या जयपालसिंग रावल यांच्या पैकी एकाची सभापती पदासाठी वर्णी लागु शकते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माजी कृषि सभापती गणेशदादा पराडके यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान काही घडामोडी घडल्यास शंकर आमश्या पाडवी यांचीही वर्णी लागु शकते.

 

 

 

 

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहन शेवाळे किंवा काँग्रेसच्या हेमलता शितोळे यांच्या गळ्यातही सभापती पदाची माळ पडु शकते.दरम्यान 20 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडीत नंदुरबार जिल्हा परिषदेत काय नाटयमयरित्या घडामोडी घडतात त्यांनतरच चित्र स्पस्ट होणार आहे.जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत पाच मतांचा फरक होता मात्र यावेळी फक्त दोन मतांचा फरक दिसत आहे.त्यामुळे काय घडेल हे सांगणे कठीण आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासींना रोजगार उपलब्ध करून स्थलांतराचा प्रश्न सोडवणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

कर्जमुक्ती योजनेसाठी निकष : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा आज शुभारंभ

Next Post
कर्जमुक्ती योजनेसाठी निकष : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा आज शुभारंभ

कर्जमुक्ती योजनेसाठी निकष : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा आज शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add