नंदुरबार l प्रतिनिधी
लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल प्रवेशद्वार ३१ ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे प्रतिपादन मा.आ.
चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रवेशद्वाराचे भूमिपूजन प्रसंगी केले.नंदुरबार येथील नगर पालिकेतर्फे गिरीविहार गेट येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वाराचे भूमिपूजन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले .त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाला सातपुडा साखर कारखान्याचे चेअरन दीपक पाटील , पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील , बाजार समितीचे सभापती हिरालाल पाटील , शेतकी संघाचे सभापती बी . के . पाटील , माजी सभापती विलासभाई पाटील , माजी नगरसेवक रमेशभाई पटेल , सरदार पटेल चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष शितल उर्फ मुन्नाभाई पटेल , प्रशांत पटेल , विजय विठ्ठल पटेल , राजेंद्र पाटील , संदीप पटेल , नगरसेवक कुणाल वसावे , कैलास पाटील , प्रमोद शेवाळे , ॲड प्रभाकर चौधरी , डॉ.विजय पटेल , सुनील पाटील , अतुल पाटील ,रमेश पाटील , शीतल पटेल , समीर पवार , मुरार पटेल , रियाज कुरेशी , चेतन वळवी , संदीप पटेल आदी उपस्थित होते . यावेळी सरदार वल्लभभाई पटेल चौक मित्र मंडळातर्फे वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला . आमदार रघुवंशी यांनी प्रवेश द्वार दोन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून ३१ ऑक्टोबर रोजी उद्घाटन करण्याचा मानस व्यक्त केला आहे .