नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील २२ ग्रामपंचतींना नोटिसा बजावूनही वीज बिल न भरल्याने या ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्याचे कनेक्शन कट करण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. संबंधित गावांमध्ये पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे तेथील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पंचायत समितीने दखल घ्यावयाची मागणी ग्रामीण भागातील जनतेने केली आहे.
तळोदा तालुक्यातील तळवे, शिर्वे, झिरी, लोभानी, बुधावली, गव्हाणीपाडा, बेलीपाडा, रापापुर, रेव्हानगर, सरदारनगर, पाठडी, भाबलपुर, सिंगपूर, बोरवण, धनपूर, लाखपूर, बंधारा, सावरपाडा, मालदा, गोंदाळे व अलवान अश्या २२ ग्रामपंचायतींच्या वीजपुरवठा शनिवारी कट करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींना वीज वितरण कंपनीने नोटिसा बजावल्या होत्या तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने वीजबिल भरण्याबाबत अनास्था दाखवल्याने नाईलाजास्तव कंपनीच्या कर्मचार्यांनी कनेक्शन कट केले आहे. या ग्रामपंचयतींकडे अडीच लाखा पासून ते पाच लाखा पर्यंत वीजबिल थकले आहे. कंपनी ने त्यांना चालू बिल भरण्याची सूचना दिली होती. मात्र ते ही न भरल्यामुळे अखेर अधिकार्यांना कटू कारवाई हाती घ्यावी लागली याबाबत विजवीतरण कंपनी च्या कार्यालयाने पंचायत समितीलाही लेखी माहिती दिली आहे. मात्र त्यांनीही ठोस कार्यवाही केली नाही.
इकडे थकीत विजबिला पोटी ग्रामपंचायत मधील ग्रामीण खेड्यांच्या पाणी पुरवठ्याच्या वीज पुरवठा खंडित केल्याने तेथे पाणी पुरवठाच ठप्प झाला आहे. परिणामी ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी गावाजवळील आजूबाजूच्या शेतात जाऊन पाणी आणावे लागत आहे. एकीकडे राज्यशासनाने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना थकलेल्या वीज बिलापोटी पंधराव्या वित्त आयोगातून खर्च करण्याची परवानगी दिली आहे. असे असतांना ग्रामपंचायत प्रशासन वीजबिल का रोखून धरत आहे असा सवाल गावकर्यांनी उपस्थित करून अश्या ग्रामपंचायतीच्या प्रशासनाची चौकशी करून नाहक ग्रामस्थांना पाण्यासाठी वेठीस धरणेकामी कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. शिवाय थकीत वीजबिल भरून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.