नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या संतांतर झाले असून नंदूरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या डॉ. सुप्रिया गावित तर उपाध्यक्ष पदी काँग्रेसचे सुहास नाईक यांची निवड झाली.
काँग्रेसच्या ॲड. सीमा वळवी यांना २५ तर भाजपच्या डॉ. सुप्रिया गावित यांना ३१ मते मिळाली.उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या सुहास नाईक यांना ३१ तर बाळासाहेबांची शिवसेनेचे ॲड.राम रघुवंशी २५ मते मिळाली.
भाजपच्या डॉ.कुमुदिनी गावित, राजश्री गावित व काँग्रेसच्या गीता पाडवी,बाळासाहेबांची शिवसेनेचे
विजय पराडके यांनी माघार घेतली.
नंदूरबार येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सुप्रिया गावित,डॉ.कुमुदिनी गावित, राजश्री गावित यांनी तर काँग्रेसकडून ॲड. सीमा वळवी, गीता पाडवी यांनी अर्ज दाखल केले होते.तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून ॲड.राम रघुवंशी, विजय पराडके यांनी उमेदवारी दाखल केला होता. दरम्यान, भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठी काँग्रसचे सुहास नाईक यांच्या अर्ज खरेदी करण्यात आला असल्याने जिल्हा परिषदेवर सत्तांतर झाले.
जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत काँग्रेसचे 24 भाजपाचे 20 राष्ट्रवादीचे चार बाळासाहेबांची शिवसेनेचे दोन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहा असे पक्षीय बलाबल आहे.








