तळोदा | ता.प्र.
तळोदा नगर परिषद पाणी पुरवठा योजनेस उकाई धरणातून प्रस्तावित ५ अ.घ.फू. पाणी मधून तापी नदी (हातोडा) गूजरात येथून २.०३ द.ल.घ.मी. पाण्याचा हक्क प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
या आदेशात म्हटले आहे कि, कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांच्याकडून नगर परिषद तळोदा जि नंदुरबार पाणी पुरवठा योजनेस उकाई धरणातून प्रस्तावित ५ अ.घ.फू. पाणी मधून तापी नदी (हातोडा) येथून २.०३ दलघमी मोठया प्रमाणात पाण्याचा हक्कास मंजूरी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला होता.
शासन निर्णयाव्दारे बिगर सिंचन मोठया प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावांना मंजूरी देण्यासाठी क्षेत्रिय वाटपाच्या मयादेनुसार सुधारीत स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. शासन निर्णयाच्या २.२ अन्वये सदर योजनेसाठी सन २०५१ ची लोकसंख्या विचारात घेऊन २.०३ दलघमी मोठया प्रमाणात पाण्याचा हक्कास मंजूरी देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.शासन निर्णयाने पाणी वापराच्या प्रकारासाठी प्रकल्पातून नमूद केल्याप्रमाणे मोठया प्रमाणात पाण्याचा हक्क मंजूर करण्यात येत आहे.
या प्रस्तावास नगरपरिषद याआर्थिकदृष्ट्टया सक्षम नसल्याने त्यांच्याकडून पिण्याच्या पाणी आरक्षणापोटी सिंचन पुन:स्थापना खर्च घेण्यात येवू नये.तसेच घरगुती पिण्याच्या पाणी प्रयोजनासाठी राज्यातील क व ड महानगरपालिकांच्या बिगरसिंचन आरक्षणाच्या प्रस्तावांस मान्यता देताना सिंचन पुर्नस्थापनेचा खर्च माफ करण्यात यावा.बिगर सिंचन पाणी पुरवठयासाठी करारनाम्याचा सुधारीत नमुना व मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासन, पाटबंधारेविभाग शासन परिपत्रक अन्वयेनिर्गमित केल्या आहेत.
त्यानुसार करारनामा करण्यात यावा.बिगरसिंचन पाणी वापराचे करारनामे वेळेवर करावेत.जलस्त्रोत प्रदुषीत करणार्या पाणी वापरकत्याकडून दंडनीय पाणीपट्टी आकारणी करणेबाबत अटींचे पालन वापरर्कत्यांना बंधनकारक राहील. बिगरसिंचन पाणीवापरकर्ते अंतिम पाणी मागणी प्रमाणे टप्प्याटप्प्याने पाणीवापर करण्याचे नियोजन नमुद करु शकतील. पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करावे. सदर पाणी पिण्याचा प्रयोजनार्थ वापर करतांना उपलब्ध करूंन दिलेल्या पाण्याची गूणवत्तायोग्य करण्याची जबाबदारी नगर परिषदेची राहील अशा अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.








