Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पीडीतेच्या परिवाराला आ. आमश्या पाडवी यांची भेट, दोषींवर कारवाईसह मदत मिळवून देण्याच्या दिले आश्वासन

team by team
October 15, 2022
in राजकीय
0
पीडीतेच्या परिवाराला आ. आमश्या पाडवी यांची भेट, दोषींवर कारवाईसह मदत मिळवून देण्याच्या दिले आश्वासन
नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील नागन प्रकल्प केळी गावाजवळील रस्त्यावरील पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू झालेल्या परिवाराला आमदार आमश्या पाडवी यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी परिवार मदतीपासून वंचित आहे असे सांगत परिवाराचे सांत्वन करीत दोषींवर कारवाईसह मदत मिळवून देण्याच्या आश्वासन दिले.
नवापूर तालुक्यातील केळी केवडीपाडा दरम्यान नागन प्रकल्पाचे पाणी रस्त्यावर येऊन पाण्यात बुडून मयत झालेल्या महिलेच्या पीडित कुटुंबाला आमदार आमश्या पाडवी यांनी भेट घेऊन सांत्वन केली. सदर पीडित कुटुंबाला अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नसून प्रकरणात बांधकाम विभाग व ठेकेदार सुमनिक कन्स्ट्रक्शन दोषी आढळल्यास कारवाईची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार आमश्या पाडवी यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण नागणप्रकल्पा अंतर्गत भरडू गावाजवळ बांधण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे केळी, केवडीपाडा हे गाव स्थलांतरित झाले असून नव्याने पुनर्वसन झालेल्या केळी गावातील नागरिकांना शेतशिवारात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर धरणाचे पाणी येऊन रस्ता पाण्याखाली जात असल्याने प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पूल बांधण्यात आला आहे. परंतु धरणातील पाण्याच्या पातळी नुसार सदर पुलाची उंची कमी असल्याने धरणातील पाण्यामुळे रस्ता पाण्याखाली जातो.
या ठिकाणी आतापर्यंत अनेक घात अपघात झाले आहे. गेल्या काही दिवसात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा पाण्यात तोल जाऊन बुडून मृत्यू झाला होता. सदर अपघात बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार सुमणिक कन्स्ट्रक्शन कंपनीने पूलाचे काम व्यवस्थित केले नसल्यामुळे गावातील नागरिकांचा जीव जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दोषी बांधकाम अधिकारी व सुमानिक कन्स्ट्रक्शन कंपनी ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
कारण धरणाचे पाणी ओवर फ्लो झाल्यास सदर पूल व रस्ता पाण्याखाली जाऊ शकतो हे माहीत असताना देखील पुलाची उंची कमी करून निकृष्ट दर्जाचा पूल व रस्ता तयार केल्याने येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मयत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती; परंतु बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार सुमाणिक कन्स्ट्रक्शन कंपनीने व नागण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यानींही नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने नागरिकांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. केळी व केवडीपाडा गावातील नागरिकांची विधान परिषदेचे शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. व या प्रकरणांमध्ये दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधान परिषदेमध्ये मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे
बातमी शेअर करा
Previous Post

अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी 83 मतदान केंद्र, उद्या मतदान

Next Post

नंदूरबार जि. प. च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काँग्रेसने सदस्यांना बजावला व्हीप

Next Post
नंदूरबार जि. प. च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काँग्रेसने सदस्यांना बजावला व्हीप

नंदूरबार जि. प. च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काँग्रेसने सदस्यांना बजावला व्हीप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add