नंदुरबार l प्रतिनिधी
अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी 83 मतदान केंद्र असून मतदानासाठी 498 कर्मचारी मतदान केंद्रा कडे रवाना झाले.
अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून १६ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अक्राणी तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या उपस्थितीत निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
२५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ८३ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास ४९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाचे साहित्य घेऊन बस व खाजगी वाहनांद्वारे ८३ पथके मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज झाली आहे.








