नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायत निवडणूक आज होणार असून नवापूर प्रशासन या निवडणूक प्रक्रिये साठी सज्ज झाले असून आज येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा हाजी मुसाजी मुल्ला वसतिगृहाचा आवारात निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले.

आज सकाळपासून तहसिलदार मंदार कुलकर्णी,नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप,दिलीप कुलकर्णी आदींचा उपस्थितीत निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले 78 ग्रामपंचायत व विविध प्रभागाची यादी बॅनर द्वारे मंडपात लावण्यात आली होती त्यामुळे आपले साहित्य कोणत्या टेबलावर प्राप्त होईल ही माहिती येणारा निवडणूक
कर्मचारी सदर बॅनर वर आपले नांव व मतदान केंद्राचे नांव पाहून सरळ आपल्या टेबलावर पोहचत होता व साहित्य घेत होता.तालुक्यातील 78 ग्रामपंचायत निवडणूक होणार असून नवापूर प्रशासन या निवडणूक प्रक्रिये साठी सज्ज
झाले असून आज येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा हाजी मुसाजी मुल्ला वसतिगृहाचा
आवारात निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले.
नवापूर तालुक्यातील एकूण 256 मतदान केंद्रावर प्रत्येकी 6 कर्मचारी असे जवळपास 1550 कर्मचारी त्यात मतदान केंद्राध्यक्ष, 3 सहकारी कर्मचारी व एक शिपाई असे कर्मचारी नियुक्त केले आहेत यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महिला व पुरुष कर्मचारी असून तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर सुरक्षित साठी नंदुरबार येथील जिल्हा पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी आपल्या सहकारी कर्मचारी निजाम पाडवी, योगेश थोरात आदींसह सदर ठिकाणी भेट दिली.माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महिला व पुरुष कर्मचारी असून तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर निवडणूक साहित्य घेऊन आपल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी जवळपास नवापूर आगारातून 37 बसेस ची सोय केली असून आगारातून सुसज्ज अशा 37 बस घेऊन आगार प्रमुख राजेंद्र अहिरे, वसंत गावीत,ज्ञानेश्वर पवार आदींसह नवापूर आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
तर निवडणूक साहित्य घेऊन आपल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी जवळपास नवापूर आगारातून 37 बसेस व खाजगी वाहनाची ची सोय केली आहे. आज निवडणूक साहित्य तपासून आपल्या केंद्रावर रवाना झाले असून उद्याची निवडणूक शांततेत पाडण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी व गृह रक्षक दलाचे जवान सह असे 200 पोलिस कर्मचारी तैनात असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी दिली.








