Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदानासाठी

team by team
October 15, 2022
in राजकीय
0
तळोदा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदानासाठी
तळोदा l प्रतिनिधी
तालूक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपापले निवडणुकीचे साहित्य घेऊन तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी एकूण ८१० कर्मचारी विविध वाहनाने रवाना झालेत. यावेळी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गिरीष वखारे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात.
तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींसाठी उद्या रविवारी (ता.१६) रोजी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती धानोरा व सोमावल बुद्रुक वगळता प्रत्यक्ष ५३ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या ५३ ग्रामपंचायतींपैकी मोरवड व चौगाव बुद्रुक येथे सरपंच बिनविरोध निवडून आल्याने त्याठिकाणी फक्त सदस्यांसाठी मतदान होणार आहे.
शनिवारी (ता. १५) सकाळी येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयाचा एकूण १४ टेबलांवर नियुक्त कर्मचाऱ्यांनी मतदानाचे साहित्याचे वाटप केले. वेळोवेळी मतदानाचे आपापले साहित्य तपासण्याच्या सूचनाही यावेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यात. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर परिवहन महामंडळाच्या १३ बसेस तसेच निवडणूक विभागाने भाडेतत्त्वावर मागवलेल्या ६ मिनी बस (स्कुल बस) व २८ चारचाकी वाहनाने पोलीस बंदोस्तात रवाना झाले.
दरम्यान निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. १ पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, १३३ पोलीस कर्मचारी, १५७ होमगार्ड व १ तुकडी प्लाँटून तैनात असणार आहे. तसेच ८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी शाहूराज मोरे, निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गिरीष वखारे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांसह महसूल कर्मचारी कामकाज पाहत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव पोलीस ठाण्यातून संशयीत आरोपी फरार

Next Post

नवापूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी कर्मचारी रवाना

Next Post
नवापूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी कर्मचारी रवाना

नवापूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी कर्मचारी रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add