नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषद शाळेत पाणी शुद्धिकरण यंत्राचे उदघाटन करून दीपावली फराळ वाटप करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्दे ता.नंदूरबार येथे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील साहेब यांच्या हस्ते पाणी शुद्धीकरण यंत्र व पाणी शीतकरण यंत्र यांचे उद्घाटन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्द मधील सर्व विद्यार्थ्यांना दीपावली निम्मित फराळ वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील साहेब , बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी, उमर्दे खुर्दचे सरपंच अरविंद ठाकरे,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष जितेंद्र मराठे,केंद्र प्रमुख वसंत पाटील , उपसरपंच सागर साळुंखे ,ग्रामपंचायत सदस्य श्रावण पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शब्बीर खाटीक, सामाजिक कार्यकर्ते गुलाब महारु मराठे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांची होत असलेली प्रगती पाहून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संगणक संच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी यांनी स्पर्धा परीक्षा ची मुलांची आवड पाहून अवांतर पुस्तके वाचनाचा सूचना दिल्या व जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्द यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश चव्हाण यांनी केले तर मुख्याध्यापक राजेंद्र नारायण बागुल यांनी आभार मानले.








