Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना न्यायालयाने ठोठावला 2 वर्ष सश्रम कारावास

team by team
October 15, 2022
in क्राईम
0
घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना न्यायालयाने ठोठावला 2 वर्ष सश्रम कारावास
नंदुरबार  l प्रतिनिधी
धडगांव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना न्यायालयाने  2 वर्ष सश्रम कारावास ठोठावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.28 ते 29 सप्टेंबर 2021 रोजीचे सकाळी 10 वा. दरम्यान धडगांव येथील पोस्ट ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून ऑफिसमधील 15,500/- रुपये किमतीचे CPU, मॉनीटर, माऊस, की-बोर्ड व बार कोड स्कैनर असा मुद्देमाल चोरी झाल्याने  राजाराम सुरसिंग सोनी रा. वरुळ कानडी ता. शहादा यांनी दिलेल्या तक्रारीवरून धडगांव ठाण्यात  भा.द.वि. कलम 457,380, 34 प्रमाणे अज्ञात आरोपीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात आरोपी योगेश्वर ऊर्फ मुन्या केशवलाल चव्हाण, विक्रम ऊर्फ विक्या रोहिदास पावरा दोन्ही रा. वडफळ्या ता धडगांव , निलेश धना वसावे रा. वरखेडी ता. धडगांव यांना दि. 1 ऑक्टोंबर 2021 रोजी तात्काळ अटक करुन आरोपीच्या ताब्यातून 2500  रुपये किमतीचे एक मॉनीटर की बोर्ड व एक माऊस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
धडगाव पोलीस ठान्याचे पोलीस हवालदार राजेंद्र भुमा जाधव यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्दतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपीविरुध्द दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, धडगांव दीपक कंखरे यांचे न्यायालयात 48 दिवसातच सादर केले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, धडगांव यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच. आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष यासर्व बाबांचा विचार करुन आरोपी हे  न्यायालयीन कोठडीत असतांनाच खटला चालविण्याचे ठरविले .
धडगांव दीपक कंखरे यांनी जलदगतीने खटला चालवून खटल्याची सुनावणी पुर्ण करुन आरोपी योगेश्वर ऊर्फ भुऱ्या केशवलाल चव्हाण, विक्रम ऊर्फ विक्या रोहिदास पावरा  दोन्ही रा. वडफळ्या ता. धडगांव, निलेश धना वसावे  रा. वरखेडी ता. धडगांव यांना 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांच्या दर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र भुमा जाधव यांनी केला असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. बी. आर. वळवी यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार समाधान केंद्रे यांनी कामकाज केले आहे.
तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच विशेष सरकारी वकील यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

दहिंदुले ग्रा.पं.उपसरपंचपदी शिंदे गटाचे गणेश नंनवरे बिनविरोध

Next Post

वैजाली जि.प.शाळेची उनपदेव येथे शैक्षणिक सहल उत्साहात

Next Post
वैजाली जि.प.शाळेची उनपदेव येथे शैक्षणिक सहल उत्साहात

वैजाली जि.प.शाळेची उनपदेव येथे शैक्षणिक सहल उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add