नंदूरबार l प्रतिनिधी
अस्तंभा यात्रेच्या अनुषंगाने अस्तंभा गावातील उमेदवार व अस्तंभा यात्रा उत्सव समिती यांची तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आताच्या अस्तंबा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक काळात तसेच अस्तंभा यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सूचना देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. तसेच अस्तंबा यात्रेत गावातील ३० स्वयंसेवक नेमावेत. यात्रेत डी.जे.साऊंड व बँड वाजविले जाणार नाहीत, याची दक्षता गावकर्यांनी घ्यावी. तसेच गावकर्यांनी आपल्या गावातील निवडणूक व यात्रा शांततेत पार पाडावी सूचना व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
यावेळी तहसीलदारांनी यात्रेत लावण्यात येणारे बंदोबस्ताची व पार्किंगची व्यवस्थेबाबत पाहणीसह, कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्थेबाबत पाहणी करून अस्तंभा व असली गावातील मतदान केंद -बूथला भेट दिली.
सदर बैठकीत ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस निरीक्षक आय.एन.पठाण, नायब तहसीलदार श्री.उकरडे, बिट अंमलदार पोना दीपक वारुळे, पो.हे.कॉ स्वप्नील गोसावी, पोह.पुष्पेंद्र कोळी, पोह.जयेश गावित, विवेक नागरे, ग्रामसेवक मानसिंग वळवी, पोलीस पाटील रे.आंबिलाल वसावे, पोलीस पाटील फॉ. कविता पोपटा वसावे, माजी सरपंच वनसिंग वळवी, माजी सरपंच अस्तंभा रेंज मधील तलाठी व ग्रामसेवक व अस्तंभा गावातील १०० ते १२५ गावकरी व कार्यकर्ते या बैठकीला हजर होते.








