नंदूरबार l प्रतिनिधी
दि. 1 ऑक्टोबर ते 7ऑक्टोबर या कालावधीत दरवर्षी देशभरात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती कार्यक्रम वनविभाग परीक्षेत्र तोरणमाळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला.
यासाठी तोरणमाळ वनपरिक्षेत्रचे वनरक्षक एम. बी.चव्हाण एस.आर.चौधरी, सूरज शेळके , जे.यु.पवार व त्यांचे सहकारी यांनी मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या तोरणमाळ परिसरात आढळणारे वन्यजीव त्यांच्या सवयी, ओळख याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तरपणे माहिती सांगितली. तसेच वन्यजीव व मानव यांच्यात केंव्हा संघर्ष निर्माण होतो, यासाठी काय करावे याची माहिती दिली.
शाळेच्या वतीने श्री चौधरी, खेडकर यांनी माहिती दिली. व सर्वांनी विद्यार्थ्यांनी आपल्या घरी गेल्यानंतर पालकांचे प्रबोधन करावे व कुठे विपरीत घटना घडल्यास त्याची तात्काळ माहिती वन विभागास द्यावी असे आवाहन केले.
श्री.चव्हाण वनरक्षक तोरणमाळ यांनी शाळेचा विदयार्थी जयसिंग याने उत्कृष्ट मनोगत मांडल्याबद्दल प्रोत्साहन पर रोख रकमेचे पारितोषक दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्तरसिंग वळवी तर आभाप्रदर्शन शभानुदास वसावे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजहर पठाण, जालमसिंग वळवी, रायसिंग वसावे, राहुल मावची, सुशील भामरे , श्रीम. उषा व इतर सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले