तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदासह परिसरात परतीचा पावसामुळे सोयाबीन, कापूस, केळी आदींसह इतर पिकांना परतीचा पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून या परतीच्या पावसामुळे शेतकर्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
चिनोदासह परिसरात सध्या सोयाबीन काढणी तसेच कापूस वेचणीचा हंगाम सुरु झाला आहे. अशातच परतीच्या पावसाने हजेरी लावण्याने सोयाबीन, कापूस, केळी पिकांचे नुकसान होऊन कापूस, केळीचे झाडे उन्मळून पडले असून चिनोदासह परिसरात दि.११ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास जोरदार झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर दिसून येत आहे.
तर काही शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले सोयाबीन तसेच काढणीवर आलेले सोयाबीन तर काही शेतकर्यांचे कापूस वेचणीस आला असून या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेतातील पिके काढणीच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिक वाया जाते की काय? या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या सोयाबीन आणि कापसाची काढणी सुरु आहे. अशातच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांचा कापूस, केळी, सोयाबीन आदी पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.