तळोदा | प्रतिनिधी
बोरद येथे आज दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी अचानक पाऊस सुरू झाल्याने या ठिकाणी कुंभार गल्लीत एका लिंबाच्या झाडावर वीज कोसळली यामुळे लिंबाच्या झाडाच्या फांद्या घराच्या छतावर येऊन आदळल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ११ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी एक वाजता अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि पावसालाही सुरुवात झाली. अशा परिस्थितीत कुंभार गल्लीत रवींद्र राजपूत, संदीप राजपूत, तुळशीराम कुंभार, मिलिंद पाटील ,लाला कुंभार हे आपल्या घराच्या ओट्यावर उभे राहून पावसाची परिस्थिती न्याहळत हळत होते.
अशा वेळेस आकाशातून जोराचा आवाज झाला आणि एक वीज अचानक समोरच्या घराशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडावर कोसळली. त्यामुळे झाडाच्या फांद्या तुटून या फांद्या राजेंद्र रमण कुंभार यांच्या घराच्या छतावर जाऊन आदळल्या.मात्र या घटनेमुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र फांद्या मोठ्या असल्याने आणि घरातील छत हे पत्र्याचे असल्याने या फांद्या पत्र्यावर जाऊन जोरात आदळल्या त्यामुळे घराच्या भिंतींना तडा गेला आहे.
यावेळी प्रत्यक्षदर्शी मिलिंद पाटील यांनी सांगितले की, मी माझ्या डोळ्यादेखत वीज पडताना त्या ठिकाणी पाहिली जोराची वीज कडाडली आणि क्षणाचाही विलंब न होता अचानक लिंबाच्या झाडावर कोसळली आणि ही वीज कोसळल्या क्षणी त्या ठिकाणी झाडाच्या फांद्यांचा अचानक जोरात आवाज झाला आणि त्या फांद्या शेजारी असलेल्या घराच्या छतावर येऊन आदळल्या.
यावेळी घरात असलेले रमण कुंभार तसेच त्यांचे परिवार बाहेर येऊन पाहते तो असा कसल्या प्रकारचा आवाज झाला आहे हे पाहण्यासाठी ते बाहेर निघाले तो त्या ठिकाणी बघणाऱ्यांची बरीच गर्दी जमली होती. काय झाले हे त्यांनाही कळले नाही परंतु प्रत्यक्ष दर्शनी त्यांना सांगितले की तुमच्या घराच्या शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडावर अचानक वीज कोसळली आणि त्या झाडाच्या फांद्या तुमच्या घराच्या छतावर कोसळल्या त्यानंतर रमण कुंभार यांनी आपल्या घराच्या भिंतींना चौहू बाजूंनी पाहिले असता त्यांच्या निदर्शनास आले की फांद्यां जोरात पडल्याने घराच्या भिंतींना तडे गेले आहेत.
मात्र घरात असताना त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. यावरून त्या ठिकाणी उपस्थित प्रत्यक्ष दर्शनी सांगितले की काळ आला होता पण वेळ आली होती त्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला.