नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील कोळी समाजाच्या वतीने रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीला रायसिंगपुरा कोळी वस्तीतून सजविलेल्या वाहनावर महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील कोळी समाजातील महिला , पुरुष, तरुण ,तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मिरवणुकीत डॉ. राजेश कोळी यांनी ढोल च्या तालावर लक्षवेधी ठेका घेतला होता .अमर चौक, अमृत चौक ,सुभाष चौक, दीनदयाल चौक या मार्गातून ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापर्यंत गेली. त्याठिकाणी लहान मुलींच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक महाआरती करण्यात आली.
या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांनी अभिवादन करून घोषणा दिल्या. नंदुरबार कोळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संस्थेचे संस्थापक दिनेश चित्ते,अध्यक्ष दादा कोळी, उपाध्यक्ष घारू कोळी,सचिव रवींद्र चव्हाण, अर्जुन शिरसाठ, कमलेश कोळी, प्रवीण कोळी, दादू कोळी, चेतन वाघ, निलेश कोळी, मनोज कोळी, अविनाश जाधव, सुनील येळवे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








